BMC Jobs Saam Tv
naukri-job-news

BMC Job: बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी; १७८ रिक्त पदांसाठी भरती; अर्ज कसा करायचा? जाणून घ्या

BMC Recruitment: सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेत निरिक्षक पदासाठी भरती सुरु आहे.

Siddhi Hande

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेत सध्या निरीक्षक पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेत कर निर्धारण व संकलन खात्यात गट क मधील निरीक्षक पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

निरीक्षक (Inspector)पदासाठी १७८ रिक्त पदे आहेत. यामध्ये अनेक पदे सामान्य प्रवर्गातील उमेदवारांसाठी, राखीव प्रवर्ग, महिला, खेळाडू माजी सैनिक यांच्यासाठी राखीव आहेत.

बृहन्मुंबई महानगरपालिकेतील इन्स्पेक्टर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने १०वी पास असणे गरजेचे आहे. त्याचसोबत कला, विज्ञान, वाणिज्य या विषयात पदवी प्राप्त केलेली असावी. १०वीच्या परिक्षेत मराठी विषय घेतलेला असावा. तसेच माजी सैनिक असलेल्या उमेदवारांकडे इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफिकेट ऑफ एज्युकेशन सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे.

या नोकरीसाठी १८ ते ३८ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. याबाबत सर्व माहिती मुंबई महानगरपालिकेच्या वेबसाइटवर दिली आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड ही परिक्षेद्वारे केली जाणार आहे. इंग्रजी भाषा आणि व्याकरण, सामान्य ज्ञान, अंकगणित परीक्षा द्यावी लागणार आहे. परिक्षेत पास झाल्यानंतरच उमेदवारांची नोकरीसाठी निवड केली जाणार आहे. (BMC Recruitment)

या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ ऑक्टोबर २०२४ आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला १००० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना ९०० रुपये फी द्यावी लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Abhijit Dipke: गांधी, नेहरू आंबेडकर पुन्हा होणे नाही, अभिजीत दिपकेने नेमकं काय सांगितलं?

Maharashtra News Live: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या शौर्यभूमीत भारताच्या चाणक्यांचा स्वागत बॅनर काढला

Purandar Fort : पुण्याजवळील ऐतिहासिक पुरंदर किल्ला, 'या' गोष्टी वाचून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल

महिनाभर रोज न चुकता करा योगा, शरीरात होतील आश्चर्यकारक 5 बदल

Gold Prices Today: आनंदाची बातमी! महिन्याच्या सुरुवातीलाच सोनं झालं स्वस्त, वाचा २४, २२ आणि १८ कॅरेटचे आजचे दर

SCROLL FOR NEXT