BIS Recruitment Saam Tv
naukri-job-news

BIS Recruitment: भारतीय मानक ब्युरोमध्ये नोकरीची संधी; मिळणार ७५००० रुपये पगार; अर्ज कसा करायचा? जाणून घ्या

BIS Recruitment 2024: भारतीय मानक ब्युरोमध्ये नोकरीची चांगली संधी आहे. कंसल्टंट पदासाठी ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी तुम्हाला ७५ हजार रुपये पगार मिळणार आहे.

Siddhi Hande

भारतीय मानक ब्युरो म्हणजे ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सने कंसल्टंट पदांसाठी भरती जाहीर केली आहे. इंडियन ब्युरो ऑफ स्टँडर्डमध्ये विविध पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. याबाबत सर्व माहिती बीआयएसच्या वेबसाइटवर देण्यात आली आहे. ब्युरो ऑफ इंडियान स्टँडर्ड हे अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या अंतर्गत येते.

ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डमध्ये सल्लागार पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ सप्टेंबर २०२४ आहे.

ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डमध्ये ९६ पदांवर भरती करण्यात येणार आहे. कंसल्टंट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून BUMS पदवी प्राप्त केलेली असावी. सेंट्रल युनिव्हर्सिटी किंवा राज्यातील विद्यापीठातून पदवी प्राप्त उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.

बीआयएसमध्ये नोकरीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. यासाठी तुम्हाला bis.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावे लागेल.

या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना ७५००० रुपये मासिक उत्पन्न मिळणार आहे. ही भरती १ वर्षाच्या कालावधीसाठी होणार आहे. दिल्ली एनसीआरमध्ये नोकरीसाठी तुम्हाला जावे लागणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ६५ वर्ष असावे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया ७ सप्टेंबरपासून सुरु झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ सप्टेंबर आहे. या नोकरीसाठी अर्ज करताना कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नगरमधील पॅथॉलॉजिकल लॅबचे तज्ञ डॉक्टरांवर गंभीर गुन्हे दाखल

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

Political News : मोठी बातमी! भाजप खासदारावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT