Bank Of Maharashtra Saam TV
naukri-job-news

Bank Of Maharashtra Recruitment: बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये १९५ जागांसाठी सुरु आहे पदभरती;या पद्धतीने करा अर्ज

Bank Of Maharashtra Recruitment 2024 Eligibility: बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये वेगवेगळ्या पदांसाठी भरती सुरु आहे. ज्यांना बँकेत काम करायची इच्छा असेल त्या उमेदवारांनी लगेच अर्ज करावा.

Siddhi Hande

बँक ऑफ महाराष्ट्र ही राज्यातील सर्वात मोठी बँक आहे. या बँकेत काम करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. तुमचेही बँकेत काम करण्याचे स्वप्न असेल तर ही माहिती खास तुमच्यासाठी. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये विविध पदांसाठी भरती सुरु आहे. या नोकरीसाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहेत.

बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये १९५ जागांसाठी भरती करण्यात येत आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ जुलै २०२४ आहे. या नोकरीसाठी बँक ऑफ महाराष्ट्रने जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये रिस्क मॅनेजमेंट, फॉरेक्स अँड ट्रेजरी, आयटी, डिजिटल बँकिंग, सीआयएसओ, सीडीओ अशा अनेक विभागात नोकरीची संधी आहे.या सर्व पदांसाठी शैक्षणिक पात्रात निश्चित करण्यात आली आहे. या नोकरीसाठी तुम्ही बँक ऑफ महाराष्ट्र, एचआरएम विभाग, मुख्य कार्यालय, लोकमंगल, शिवाजीनगर, पुणे- ४११००५ येथे अर्ज पाठवायचा आहे.

बँकेत काम करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी इतर अनेक बँकेत नोकरीची संधी आहे. सध्या नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदामध्ये वेगवेगळ्या पदांसाठी भरती सुरु आहे. यासाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. बँकेच्या वेबसाइटवर नेहमी नवनवीन नोकरीबाबत अपडेट येत असतात. याचसोबत सरकारी बँकेत जॉब मिळवण्यासाठी आयबीपीएसद्वारे परीक्षा घेतली जाते. आयबीपीएसद्वारे वर्षातून एकदा परीक्षा घेतली जाते. या परीक्षेत पास झाल्यानंतर मुलाखतीचा राउंड होतो. त्यानंतर सरकारी बँकेत नोकरीची संधी मिळते. या परीक्षा वेगवेगळ्या पोस्टसाठी होतात. त्यात क्लर्क, स्पेशलिस्ट ऑफिसरसाठी वेगवेगळ्या परीक्षा घेण्यात येतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai T20 League: टी-२० लीगमध्ये मराठा संघाची 'रॉयल' कामगिरी; सलग दुसऱ्यांदा जेपेतपदावर कब्जा

अनुसूचित जातीत उपवर्गीकरण करायला हरकत नाही; रामदास आठवलेंनी सांगितलं कारण, VIDEO

IND vs AFG: शुबमन गिलसमोर अफगाण गोलंदाजी फेल; टीम इंडियाचा पहिल्या वनडेत शानदार विजय

Yavatmal Crime: खासगी रुग्णालयात धारदार शस्त्राने हल्ला करत नर्सची हत्या; यवतमाळ हादरलं

वीज मीटर ४८ तासांत बदलणार; 'महावितरण'कडून ग्राहकांना अल्टिमेटम? काय आहे मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT