Bank Of Baroda Job Saam Tv
naukri-job-news

Bank Jobs: बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची सुवर्णसंधी; ३३० पदांसाठी भरती सुरु; अर्ज कुठे अन् कसा करावा?

Bank Of Baroda Recruitment: बँक ऑफ बडोदामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. ३३० रिक्त पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

  • बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची संधी

  • ३३० पदांसाठी भरती सुरु

  • अर्जप्रक्रिया जाणून घ्या

बँक ऑफ बडोदामध्ये सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. बँक ऑफ बडोदामध्ये सध्या विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. बँकेत एकूण ३३० पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यासाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे.

बँक ऑफ बडोदामध्ये (Bank Of Baroda Recruitment) असिस्टंट मॅनेजर, डेप्यूटी मॅनेजर, सायबर सिक्युरिटी पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी तुम्ही अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे. www.bankofbaroda.in ही अधिकृत वेबसाइट आहे.

बँक ऑफ बडोदामधील या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तरीख १९ ऑगस्ट २०२५ आहे. त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

पात्रता (Eligibility)

बँक ऑफ बडोदामधील या नोकरीसाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कॉम्प्युटर सायन्समध्ये पदवी प्राप्त केलेली असावी. बीई, बीटेक, एमई, एमटेक किंवा कॉम्प्युटर सायन्समध्ये एमएससी पदवी प्राप्त केलेली असावी. या नोकरीसाठी विविध पदांसाठी पात्रता वेगवेगळी असते. त्यामुळे इच्छुकांनी आधी अधिसूचना वाचा त्यानंतरच अर्ज करावेत.

या नोकरीसाठी वयोमर्यादा ही पदानुसार वेगवेगळी असणार आहे. या नोकरीसाठी २२ ते ३१ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. तसेच पदानुसार ३१ ते ४८ वयोगटातीलदेखील उमेदवार अर्ज करु शकतात. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.

या नोकरीसाठी अर्ज करताना तुम्हाला शुल्क भरायचे आहे. सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ८५० रुपये शुल्क भरायचे आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना १७५ रुपये शुल्क भरायचे आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखतीद्वारे होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tea increase cholesterol: चहामुळे कोलेस्ट्रॉल वाढतं? तज्ज्ञांनी सांगितलं कोणी पिऊ नये चहा

Maharashtra News Live Update: १० सप्टेंबर रोजी पुण्यातील साउंड व्यवसायिक मोर्चा काढण्याच्या तयारीत

Asangaon Tourism : वीकेंडला कुठे जायचं? आसनगावजवळची ५ सुंदर ठिकाणं देतात निसर्गाचा भन्नाट अनुभव

High Cholesterol: हृदयाच्या नसांमध्ये जमलेलं कोलेस्ट्रॉल मेणासारखं वितळवेल ही लसणाची चटणी; बनवण्याची पद्धत आताच लिहून घ्या

Pune Dry Day : पुण्यात 'या' ५ महत्त्वाच्या दिवशी दारू विक्री पूर्णपणे बंद, उत्पादन शुल्क विभागाचे आदेश

SCROLL FOR NEXT