Bank Of Baroda Recruitment Saam Tv
naukri-job-news

BOB Recruitment: बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची सुवर्णसंधी; १४६ रिक्त पदे; मिळणार भरघोस पगार; अर्ज कसा करावा?

Bank Of Baroda Recruitment 2025: बँक ऑफ बडोदामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. प्रोफेशनल पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. बँक ऑफ बडोदामध्ये सध्या भरती सुरु आहे. बँक ऑफ बडोदामध्ये (Bank Of Baroda) विविध विभागात ही भरती जाहीर करण्यात आली आहे. प्रोफेशनल पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया कालपासून म्हणजेच २६ मार्चपासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

बँक ऑफ बडोदामधील या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करावेत. bankofbaroda.in वेबसाइटवरील करिअर सेक्शनमध्ये जाऊन फॉर्म भरावेत. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ एप्रिल २०२५ आहे. त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

बँक ऑफ इंडियामध्ये एकूण १४६ रिक्त पदांवर भरती करण्यात आली आहे. डेप्युटी डिफेंस बँकिंग अॅडवायजर, प्रायव्हेट बँक रेडियंस प्रायव्हेट, ग्रुप हेड, टेरिटरी हेड, सिनियर रिलेशनशिप मॅनेजर, प्रोडक्ट हेल्थ, पोर्टफोलियो रिसर्च अॅनालिस्ट या पदांसाठी ही भरती करण्यात आली आहे. (BOB Recruitment)

बँक ऑफ बडोदामधील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले असावे. २२ ते ५७ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.

अर्ज कसा करावा

सर्वप्रथम तुम्हाला bankofbaroda.in या वेबसाइटवर जायचे आहे.

यानंतर करिअर सेक्शनवर जाऊन भरती संबंधिक लिंकवर क्लिक करायचे आहे.

यानंतर डिपार्टमेंटची निवड करुन अर्जप्रक्रिया पूर्ण करा.

तुम्हाला निर्धारित शुल्क भरायचे आहे. या फॉर्मची प्रिंट आउट काढून तुमच्याजवळ ठेवा.

या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ६०० रुपये शुल्क भरायचे आहे. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना १०० रुपये भरायचे आहे. तुम्ही ऑनलाइन शुल्क भरु शकतात. तुम्ही ऑनलाइन पद्धतीने हे शुल्क भरु शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पंढरपूर दौऱ्यावर

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

SCROLL FOR NEXT