Indian Bank Recruitment Saam Tv
naukri-job-news

Indian Bank Job: इंडियन बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; पात्रता काय? पगार किती? जाणून घ्या सर्वकाही

Indian Bank Recruitment: इंडियन बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. डॉक्टर पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती कंत्राटी पद्धतीने होणार आहे.

Siddhi Hande

बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. इंडियन बँकेत नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. इंडियन बँकेत सध्या डॉक्टर पदासाठी भरती करण्यात येत आहे. ही भरती कंत्राटी पद्धतीने करण्यात येणार आहे.इंडियन बँकेतील या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. (Indian Bank Recruitment)

इंडियन बँकेची ही भरती सुरु झाली आहे. याबाबत सविस्तर माहिती indianbank.in या वेबसाइटवर दिली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २० डिसेंबर २०२४ आहे. (Indian Bank Job)

पात्रता (Indian bank job Eligibility)

इंडियन बँकेतील डॉक्टर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाद्वारे मान्यताप्राप्त अॅलोपॅथिक मेडिकल सिस्टीममधून एमबीबीएस पदवी प्राप्त केलेली असावी. तसेच त्यांच्याकडे १० वर्षे कामाचा अनुभव असायला हवा.

इंडियन बँकेतील या भरती मोहिमेत अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शॉर्टलिंस्टिग केली जाणार आहे. तसेच उमेदवारांच्या परफॉर्मंसच्याआधारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.या नोकरीसाठी तुम्हाला २०,००० रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी अर्ज तुम्हाला इंडियन बँक, झासी अंचल, ९२, सिविल लाइन्स, झाशी येथे पाठवायचा आहे.

CRPF मध्ये भरती

सीआरपीएफमध्ये सध्या भरती सरु आहे.सीआरपीएफमध्ये वेटरनरी पदांसाठी भरती सुरु आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ जानेवारी २०२४ आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी crpf.gov.inया वेबसाइटवर जाऊन अर्ज करावेत. या नोकरीसाठी अर्ज करण्याची कमाल वयोमर्यादा ७० वर्षे आहेत. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना ७५००० रुपये मानधन मिळणार आहे. त्याचसोबत अनेक भत्तेदेखील दिले जाणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पंढरपूर दौऱ्यावर

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

SCROLL FOR NEXT