EXIM Bank Job Saam Tv
naukri-job-news

EXIM Bank Job: EXIM बँकेत ऑफिसर होण्याची सुवर्णसंधी; मिळणार भरघोस पगार; अशा पद्धतीने करा अर्ज

EXIM Bank Recruitment: बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे.EXIM बँकेत सध्या ऑफिसर पदासाठी भरती सुरु आहे.

Siddhi Hande

भारतीय निर्यात-आर्यात बँक म्हणजे EXIM Bank मध्ये सध्या भरती सुरु आहे. एक्झिम बँकेत ऑफिसर पदासाठी भरती सुरु आहे. बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी नोकरी करण्याची ही चांगली संधी आहे.EXIM बँकेतील या भरतीसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात.

EXIM बँकेतील ही भरती कंत्राटी पद्धतीने केली जाणार आहे. बँकिंग सेक्टरमध्ये करिअर करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. यासाठी तुम्हाला एक्झिम बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करावे लागेल.

एक्झिम बँकेतील ऑफिसर पदाच्या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ ऑक्टोबर २०२४ आहे. या नोकरीसाठी एकूण ८८ रिक्त पदांवर भरती केली जाणार आहे.

बॅचलर डिग्री, मास्टर डिग्री, पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री किंवा एमबीए पदवी प्राप्त उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. २७ ते ६५ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना १ ते २० वर्षांचा अनुभव असावा.कामाच्या अनुभवानुसार उमेदवारांची योग्य पदासाठी निवड केली जाणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड करण्यासाठी समिती तयार केली जाईल. त्यानंतर निवडलेल्या उमेदवारांनी मुलाखतीसाठी बोलावले जाईल. त्यानंतर शॉर्टलिस्टिंग करुन उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.

नोकरीसाठी अर्ज कसा करावा

  1. सर्वप्रथम तु्म्हाला एक्झिम बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर म्हणजे eximbankindia.in वर जावे.

  2. त्यानंतर करिअर सेक्शनवर क्लिक करा.

  3. त्यानंतर उमेदवारांना ऑनलाइन फॉर्म भरावा लागेल. त्याचसोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करावे लागतील.

  4. यानंतर उमेदवारांनी आपला फॉर्म सबमिट करावा. त्यानंतर उमेदवारांनी या फॉर्मची प्रिंट आउट काढावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss Recipe : महिनाभर सकाळच्या नाश्त्याला खा 'हा' पदार्थ; झपाट्याने वजन होईल कमी, वाचा रेसिपी

Ladki Bahin Yojana: फेब्रुवारीचे ₹१५०० खात्यात जमा; एप्रिल महिना उजडला, लाडकीला मार्च महिन्याचे पैसे कधी मिळणार?

Maharashtra Live News Update: वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर पुणे पोलिसांकडून पुन्हा मोठी कारवाई

Sabja Badam Milk Recipe: उन्हाळ्यात घरच्या घरी करा फालूदा सारखा टेस्टी आणि रिफ्रेशिंग सब्जा बदाम मिक्ल

Riteish Deshmukh - Raja Shivaji : "जबरदस्त भाऊ, सरळ हृदयात..." ; 'राजा शिवाजी'ला पाहून अंगावर काटा येईल | VIDEO

SCROLL FOR NEXT