gaurav taneja, YouTuber saam tv
देश विदेश

YouTuber गौरव तनेजाचा जामीन मंजूर; वाढदिनी झाली हाेती अटक

शनिवारी गाैरव तनेजाचा हाेता वाढदिवस.

साम न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश येथील नोएडा (noida) येथून पोलिसांच्या (police) अटकेत (arrest) असलेल्या यूट्यूबर (youtube) गौरव तनेजा (gaurav taneja) याची जामीनावर (gaurav taneja gets bail) मुक्तता करण्यात आली आहे. शनिवारी गाैरव तनेजा याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी मेट्रो स्टेशनवर (Metro Station) मोठी गर्दी केली होती. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. या कारणास्तव गाैरव तनेजाला अटक झाली हाेती. (gaurav taneja latest marathi news)

'फ्लाइंग बीस्ट' (flying beast) हे यूट्यूब वरील चॅनलमुळं तनेजा हा लाेकप्रिय आहे. त्याने नोएडातील सेक्टर 51 मेट्रो स्टेशनवर त्याचा वाढदिवस साजरा करण्याचे नियाेजन केले. शनिवारी तनेजाने इंस्टाग्रामवर एक पोस्ट पोस्ट केली होती, ज्यात चाहत्यांना मेट्रो स्टेशनवर जमण्यास सांगितले गेले. यानंतर सेक्टर 51 मेट्रो स्टेशनवर हजारो नागरिक जमा झाल्याने चेंगराचेंगरी झाली असेही सांगितलं जात आहे. गौरव तनेजाचे इंस्टाग्रामवर ३.३ मिलियन पेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत.

गौरवची पत्नी रितू राठी (ritu rathee) हिने मेट्राे स्टेशन येथे तनेजाचा वाढदिवस साजरा करेल आणि केक कापेल अशी पाेस्ट शनिवारी सकाळी इन्स्टाग्रामवर केली. तसेच तिने नियमांचे पालन करुया. लवकरच भेटू असेही लिहलं. त्यानंतर घटनास्थळी माेठा जमाव जमला हाेता.

नोएडामधील कोविडच्या प्रादुर्भावामुळे रुग्ण संख्य वाढू नये यासाठी केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन तनेजाने केल्याने त्याला पाेलीसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर नोएडा पोलिसांनी त्यास अटक केली हाेती. अटक झाल्यानंतर अवघ्या काही क्षणात गौरव तनेजा ट्विटरवर ट्रेंड करू लागला हाेता.

दरम्यान रात्री उशिरा गाैरव याने साेशल मिडियातून आपल्या कुटुंबासह एक छायाचित्र पोस्ट करीत वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी चाहत्यांचे आभार मानले आहेत. त्याची जामीनावर मुक्तता झाल्याने त्याचे चाहते खूष झाले आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live: नाशिक शहरात सकाळपासून पावसाने घेतली विश्रांती

Lung Cancer Stage 1: फुफ्फुसांच्या कॅन्सरच्या स्टेज 1 मध्ये ही 5 लक्षणं दिसून येतात; शरीर देत असलेले संकेत वेळीच ओळखा

School Closed : शाळा - महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, नाशिक जिल्हा प्रशासनाचा निर्णय

Mumbai Tourism : वीकेंडला जोडीदारासोबत निवांत वेळ घालवा, 'ही' आहेत मुंबईतील रोमँटिक अन् सुंदर ठिकाणे

Hingoli Accident: महामार्गावर भयंकर अपघात! खड्ड्यात कार आदळून उलटली, २ तरुणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT