Akhilesh Yadav VIral Video  Saam TV
देश विदेश

Akhilesh Yadav Viral Video : 'नेताजी, नोकरी मिळत नाहीय, पेपर लीक होतायेत'; तरुणांंच्या प्रश्नाला अखिलेश यादवांनी दिलेलं उत्तर व्हायरल

Uttar Pradesh Political News : अखिलेश यादव गुरुवारी एका विवाह सोहळ्यात सहभागी होण्यासाठी प्रयागराजला पोहोचले होते. तेथे काही तरुणांनी त्यांना नोकरीबाबत विचारणा केली.

प्रविण वाकचौरे

Uttar Prasesh News :

समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अखिलेश यादव यावेळी दिल्लीवाल्यांना बेरोजगार करा, तुम्हाला नोकरी मिळेल, असं म्हणताना दिसत आहेत.

अखिलेश यादव गुरुवारी एका विवाह सोहळ्यात सहभागी होण्यासाठी प्रयागराजला पोहोचले होते. तेथे काही तरुणांनी त्यांना नोकरीबाबत विचारणा केली. त्यावेळी त्यांनी असं उत्तर दिलं आहे.

लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे नेत्यांचे दौरे, सभा, भेटीगाठी वाढल्या आहेत. सर्वेच नेते प्रचाराची एकही संधी सोडताना दिसत नाही. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव देखील एका लग्न समारंभात गेले होते. तिथे त्यांना संधी मिळताच त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. (Latest News)

झालं असं की, अखिलेश यादव यांच्या प्रयागराज दौऱ्यादरम्यान काही स्थानिक तरुणांनी अखिलेश यादव यांना नोकरीबाबत विचारणा केली. 'नेताजी आमच्याबद्दल काही विचार करा. नोकरी मिळत नाहीय. पेपर लीक होत आहेत', असे आपले प्रश्न तरुणांनी अखिलेश यादव यांच्यासमोर मांडले.

त्यावर अखिलेश यादव यांनी म्हटलं की, नोकरी तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही दिल्लीवाल्यांना बेरोजगार कराल. त्यानंतर तरुणांनी 'अखिलेश भैया झिंदाबाद'चा नारा दिला. (Uttar Pradesh News)

अखिलेश यादव पुढे म्हणाले की, तरुणांना रोजगार मिळावा अशी सरकारची इच्छा नाही. सरकारच्या हेतूत दोष आहे. पेपर लीक होत नाहीत, हे सरकार पेपर लीक करत आहे. आज शेतकऱ्यांवर संकट आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले नाही. सरकारची घोषणा नुसती हवा आहे. पेपरफुटीमुळे राज्यातील एक कोटी 80 लाख लोकांना फटका बसला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT