Heart Attack Video Twitter/@baisaneakshay
देश विदेश

Video: पेपर वाचताना सोफ्यावरून अचानक खाली कोसळला, हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Rajasthan Heart Attack Video: पेपर बाजूला ठेवल्याच्या काही सेकंदानंतरच तरुणाला हृद्यविकाराचा तीव्र झटका आला आणि तो सोफ्यावरुन खाली पडला.

Akshay Baisane | अक्षय बैसाणे

Viral Video News : मृत्यू हे अंतिम सत्य आहे असं म्हटलं जातं. मानवाला मृत्यू कुठे, कधी आणि कसा गाठेल याबाबत काहीही सांगता येत नाही. वृद्धपाकाळाने, आजाराने, अपघाताने किंवा अचानक मृत्यू (Death) माणसाला कधीही गाठू शकतो. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात एका तरुणाला वृत्तपत्र वाचताना हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा मृत्यू झाला. (Rajasthan Heart Attack News)

मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानमधील बारमेर जिल्ह्यातली ही घटना आहे. 5 नोव्हेंबर रोजी ही घटना घडली होती. एका ऑफिसमधला हा व्हिडिओ (Viral Video) आहे. यात एक तरुण नेहमीप्रमाणे ऑफिसमध्ये आला आणि सोफ्यावर बसून पेपर वाचू लागला. पेपर वाचत असल्याच्या काही काळानंतरच तरुणाला अस्वस्थ वाटू लागलं, त्यामुळे त्याने पेपर बाजूला ठेवला.

पाहा व्हिडिओ -

पेपर बाजूला ठेवल्याच्या काही सेकंदानंतरच तरुणाला हृद्यविकाराचा तीव्र झटका (Heart Attack) आला आणि तो सोफ्यावरुन खाली पडला. यावेळी समोरच बसलेली एक रिसेप्शनीस्ट महिला देखील घाबरली. काहीतरी पडल्याच्या आवाजावरुन ऑफिसमधील इतर सहकारी हेदखील बाहेर आले आणि त्यांनी तात्काळ तरुणाला रुग्णालयात दाखल केलं, तोपर्यंत तरुणाने प्राण गमावले होते.

मृत्यूबाबत भगवान गौतम बुद्धांचे विचार:

भगवान बुद्धांनी (Gautama Buddha) आम्रपालीला अनित्यवादाचा उपदेश देताना सांगितले, की "हे संपुर्ण जग व त्यातील सर्वच भौतिक व चैतन्यमय वस्तु या सर्व परिवर्तनशील व अनित्य आहेत, अस्थीर व अस्थाई आहेत. या बहुमोल उपदेशाचा आम्रपालीच्या मनावर अतिशय खोलवर परिणाम झाला व तिच्या मनात भगवंताच्या धम्माविषयी खुप श्रद्धा निर्माण झाली व तिने त्यांच्या हस्ते परिव्रज्या धारण केली व ती भिक्खुणी संघात सामील झाली. तिने आत्मचिंतन केल्यावर तिला समजले कि, आपले सौंदर्य, लावण, तारुण्य हे अस्थाई आहे, माझे शरीर दुर्गंधीचे केंद्र आहे. हे सौंदर्य नश्वर आहे, ते नष्ट होऊन वार्धक्य येणार आहे व शेवटी हे शरीर नष्ट होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Medha Rana: बॉर्डर २ मध्ये झळकणारी मेधा राणा कोण? जाणून घ्या

Pune Rave party Case : प्रायव्हेट व्हिडिओ व्हायरल, एकनाथ खडसे यांच्याकडून गंभीर आरोप; पुणे पोलीस आयुक्तांकडून स्पष्टीकरण

Raigad : रायगडमध्ये मासेमारी बंदीच्या आदेशाचे उल्लंघन! 38 मच्छिमारांवर कारवाई | VIDEO

दह्यासोबत हे पदार्थ चुकूनही खाऊ नका, फूड पॉयझनचा असतो धोका

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं भाषण सुरू, मंचावर भाजप नेत्याच्या डुलक्या; व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT