Viral Video Saam TV
देश विदेश

Viral Video: मित्राचं लग्न म्हणून नाच नाच नाचला अन् अचानक खाली कोसळला, तरुणाच्या मृत्यूने हळहळ

हृदयविकाराच्या झटक्याने तरुणाचा मृत्यू झाला असावा असा अंदाज वर्तवला जात आहे.

साम टिव्ही ब्युरो

लखनौ : मध्य प्रदेशच्या रीवामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मित्राच्या वरातीत नाचताना तरुणाचा मृत्यू झाला आहे. हृदयविकाराच्या झटक्याने तरुणाचा मृत्यू झाला असावा असा अंदाज वर्तवला जात आहे. घटनेनंतर लग्नाच्या आनंदी वातावरणात शोककळा पसरली. घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रीवा येथे लग्नाचं वऱ्हाड आलं होतं. वरातीत नवरदेवाचा मित्र मोठ्या उत्साहात नाचत होता. मात्र नाचता नाचता तो अचानक जमिनीवर कोसळला. त्यानंतर आजूबाजूला असलेले सर्वजण त्याच्याकडे तातडीने पोहोचले. (Latest Marathi News)

तरुणाला तत्काळ या जवळील संजय गांधी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ह्रदयात अचानक दुखू लागल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याचे उपस्थितांनी सांगितलं. मात्र मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच समजेल.

या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. तरुण डोक्यावर फेटा बांधून मोठ्या आनंदात नाचताना दिसत आहे. बराच वेळ डान्स केल्यानंतर तरुण अचानक जमिनीवर पडताना दिसतोय. उपस्थित अनेकजण त्याच्या डान्सचा व्हिडिओ बनवत होते. मात्र अचानक तरुण जमिनीवर कोसळला आणि त्याचा यात दुर्देवी मृत्यू झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Gang war: भर चौकात गणेशचा केला गेम; हाती कोयता घेऊ मारेकऱ्यांची धूम, हत्याकांडाचा CCTV आला समोर

Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य,धक्कादायक कारण आलं समोर

Akola Crime: 'माझं तुझ्यावर खूप प्रेम; अग्निवीर जवानाकडून लग्नाच्या भूलथापा, 29 वर्षीय किन्नरवर अत्याचार

दोन पिस्तूल, कोयता आणि भयानक कट… असा रचला अक्षय नागलकरच्या हत्येचा प्लॅन|VIDEO

Raigad News: पोहण्याचा मोह जिवाशी आला! अलिबागमधील समुद्रात दोन तरुण बुडाले, ड्रोनद्वारे शोध सुरू

SCROLL FOR NEXT