Corona Update Saam tv
देश विदेश

Corona Update : भारतात कोरोनाचा नवा व्हेरिएंट; आरोग्य यंत्रणेचे दणाणले धाबे, वाचा स्पेशल रिपोर्ट

India Corona Update : भारतात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत होतेय. अशातच कोरोनाचा नवा व्हेरिएंट देशात दाखल झालाय. XFG हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट किती धोकादायक आहे. पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Saam Tv

सुप्रीम मस्कर, साम टीव्ही

देशात पुन्हा एकदा कोरोनानं डोकं वर काढलय. देशातील कोरोना रुग्णांची संख्या 6815 वर पोहोचलीय. दिल्ली, झारखंड आणि केरळ या तीन राज्यांमध्ये तीन कोरोना रुग्णांचा मृत्यूही झालाय. त्यातच भारतात आता कोविडचा नवीन व्हेरिएंट XFG चे 163 रुग्ण आढळलेत. कोरोनाचा हा नवीन व्हेरिएंट नागरिकांसाठी किती धोकादायक आहे. पाहूयात...

कोरोनाचा नवा व्हेरिएंट XFG

XFG व्हेरिएंट हा ओमिक्रॉनचा उप-प्रकार

नव्या व्हेरिएंटचा पहिला रुग्ण कॅनडामध्ये

XFG व्हेरिएंटचा विषाणूचा वेगाने प्रसार

XFG व्हेरिएंटचा रोगप्रतिकारक शक्तीवर हल्ला

महाराष्ट्रात XFG व्हेरिएंटची सर्वाधिक 89 रुग्णसंख्या

आंध्र, मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी 6 रुग्ण

XFG चे तामिळनाडूत 16, केरळमध्ये 15 तर गुजरातमध्ये 11 रुग्ण

कोरोनाचा हा नवीन व्हेरिएंट सौम्य आहे. मात्र त्याचा परिणाम गंभीर रुग्ण आणि कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या रुग्णांवर होत आहे. त्यामुळे मागील अनुभव लक्षात घेत राज्यातल्या अनेक शासकीय रुग्णालयात कोरोना उपचाराचे विशेष कक्ष उभारण्यात आले आहेत. तरीही नव्या कोरोना व्हेरिएंटला हलक्यात न घेता नागरिकांनी काळजी घ्यावी.. अन्यथा बेसावधपणा तुमच्यासाठी जीवघेणा ठरु शकतो...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: धाराशिव जिल्ह्यात नगरपरिषद मतदार यादीत घोळ

Pune Police: पुण्यात १७ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या, कुणाची कुठे झाली बदली? वाचा संपूर्ण लिस्ट

Tridashansh Yog: अवघ्या काही तासांनी गुरु-बुध तयार करणार त्रिदशांश योग; 'या' राशींच्या नशीबी येणार अखेर श्रीमंती

Jalna News: मोठी बातमी! महानगरपालिकेच्या आयुक्तांना १० लाखांची लाच घेताना अटक

Bjp vs Shivsena: दिवाळीआधीच महायुतीत वादाचे फटाके, 'ठाण्यात भाजपचा महापौर होणार' भाजपचा स्वबळाचा नारा

SCROLL FOR NEXT