World Needs To Be Prepared For The Next Pandemic said who Chief  Saam tv
देश विदेश

WHO Chief Warn For Next Pandemic: कोरोनापेक्षा भयंकर महामारी येणार! WHO प्रमुखांनी दिला इशारा, 2 कोटी लोकांचा होऊ शकतो मृत्यू

कोरोनापेक्षा भयंकर महामारी येणार! WHO प्रमुखांनी दिला इशारा

Satish Kengar

WHO Chief Warn For Next Pandemic: कोरोनाची साथ अद्याप पूर्णपणे संपलेली नाही. याआधी आणखी एक साथीचा इशारा देण्यात आला आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे (WHO) प्रमुख डॉ. ट्रेडोस गेब्रेयसस यांनी इशारा दिली आहे की, जगाने पुढच्या महामारीसाठी तयारी करावी, जी कोविड-19 साथीच्या आजारापेक्षा जास्त घातक असू शकते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, डब्ल्यूएचओचे प्रमुख ट्रेडोस गेब्रेयसस म्हणाले की, जगाने कोविडपेक्षाही घातक असलेल्या व्हायरससाठी तयार राहायला हवे.

एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, डब्ल्यूएचओच्या प्रमुखांनी 76 व्या जागतिक आरोग्य संमेलनात आपला अहवाल सादर करताना हे सांगितले. ते म्हणाले की, कोरोनामुळे किमान 2 कोटी लोकांचा मृत्यू झाला आहे. अलीकडेच डब्ल्यूएचओने घोषणा केली होती की, कोविड-19 महामारी आता आरोग्य आणीबाणी नाही.  (Latest Marathi News)

टेड्रोस यांनी स्वित्झर्लंडमधील जिनेव्हा येथे आरोग्य परिषदेत सांगितले की, पुढील साथीच्या रोगाला रोखण्यासाठी चर्चा करण्याची वेळ आली आहे. डब्ल्यूएचओ प्रमुखांनी इशारा दिला की, कोरोना अद्याप संपलेला नाही.

टेड्रोस म्हणाले की, ''लवकरच मोठी महामारी येणार आहे. यासाठी आपण आतापासूनच तयार राहायला हवं.'' ते म्हणाले की, ''ही पिढी साथीच्या आजाराला चांगल्या प्रकारे सामोरे गेली आहे. महामारीशी त्यांनी कोणतीही तडजोड केली नाही. कारण लहानसा विषाणू किती भयानक असू शकतो याचा अनुभव या लोकांनी घेतला आहे.'' (Viral Video News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actress Pregnant : ५२ व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्री आई होणार! बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचे PHOTO अन् VIDEO व्हायरल

Sugar Free Drink : शुगर फ्री ड्रिंक डायबिटीज रूग्णांसाठी हानिकारक की फायद्याचे?

Maharashtra News Live Update: बेळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांचा ताफा अडवला

Honey Tea : मधाच्या चहाचे ७ फायदे वाचून तुम्ही आजपासून प्यायला सुरुवात कराल, दूध-साखरेचा चहा विसराल

Rasgulla Recipe: गोड खायला आवडतं? मग घरच्या घरी बनवा रसाळ रसगुल्ले, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT