Viral Video  SaamTv
देश विदेश

Viral Video: बाबो! कसलं ते धाडस! महिलेने थेट सिंहालाच उचलून घेतले, पुढे जे झालं ते.... पाहा व्हिडिओ

कधी कधी सोशल मीडियावर असे काही व्हिडिओ व्हायरल होतात, जो खरा की खोटा असाही प्रश्न आपल्याला पडतो. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्येही असाच प्रकार पाहायला मिळत आहे.

Gangappa Pujari

Viral Video: सोशल मीडियावर कधी कोणता व्हिडिओ व्हायरल होईल हे काही सांगता येत नाही. हे व्हायरल व्हिडिओ कधी आश्चर्य चकित करणारे असतात तर कधी पोटभरुन हसायला लावणारे असतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे, जो पाहून क्षणभर तुमचीही भितीने गाळण उडेल. काय आहे या व्हायरल व्हिडिओचा किस्सा. (Viral Video)

कधी कधी सोशल मीडियावर असे काही व्हिडिओ व्हायरल होतात, जो खरा की खोटा असाही प्रश्न आपल्याला पडतो. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्येही असाच प्रकार पाहायला मिळत आहे. कारण या व्हिडिओमध्ये एक महिला थेट सिंहालाच उचलून घेताना दिसत आहे.

यामध्ये एक महिला थेट सिंहाला तिच्या कडेवर घेताना दिसत आहे. तर सिंह मात्र महिलेच्या हातातून निसटण्यासाठी धडपडत असल्याचे पाहायला मिळत आहे. नेटकरी हा व्हायरल व्हिडिओ पाहून आश्चर्य व्यक्त करत आहेत तर अनेकांनी या धाडसी महिलेचे कौतुक केले आहे

हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर (Instagram) शेअर करण्यात आला आहे. दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ कुवैतमधील असल्याची सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर व्हिडिओमध्ये दिसणारी ही महिला त्या सिंहाची मालकीण असल्याचीही माहिती समोर आली आहे. तरीही महिलेने दाखवलेल्या या धाडसाचे नेटकरी कौतुक करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Gazette : जरागेंना बळ मिळाले! मराठा आरक्षणात कोल्हापूर गॅझेटची एन्ट्री, कुणबी अन् मराठाबाबत महत्त्वाची नोंद

Maharashtra Live News Update: अकोल्यातील गँगवॉरमधील १७ गुन्हेगारांवर मकोका

Taloda Heavy Rain : तळोदा तालुक्यात अतिवृष्टी; २४ तासांपासून पावसाची संततधार, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Viral Video : क्षुल्लक कारणावरून सुरू झालं भांडण नंतर दे दणादण; त्या हॉटेलबाहेर नेमकं काय घडलं?

Box Office Collection: बॉलिवूड अन् हॉलिवूडमध्ये काटें की टक्कर; 'बागी 4', 'द बंगाल फाइल्स', 'द कॉन्ज्यूरिंग' कोणी मारली बाजी?

SCROLL FOR NEXT