High Court News  Wikipedia
देश विदेश

High Court News : महिला बलात्कार करू शकत नाही, तरीही...; बलात्कार प्रकरणी हायकोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय

High Court : 'महिला बलात्कार करु शकत नाहीत, मात्र त्या बलात्कार करण्यासाठी प्रवृत्त करत असतील, तर त्यांना देखील शिक्षा होईल' असे मध्यप्रदेश हायकोर्टाने म्हटले आहे. एमपी हायकोर्टाने असे का म्हटले आहे? वाचा सविस्तर

Yash Shirke

High Court News Update : 'महिला स्वत: बलात्कार करु शकत नाही, पण त्या बलात्कार करण्यासाठी प्रवृत्त करु शकत असल्यास त्यांना शिक्षा होईल' असे वक्तव्य मध्यप्रदेश हायकोर्टाने केला आहे. एका गंभीर प्रकरणात निकाल देताना हायकोर्टाचे न्यायमूर्ती प्रमोद कुमार अग्रवाल यांच्या एकल खंडपीठाने आरोपीच्या आई आणि भावाला दोषी ठरवले आहे. कोर्टाने दोघांवर कलम 376 r/w 34, 109 और 506-11 अन्वये गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले.

काय आहे प्रकरण?

२१ ऑगस्ट २०२२ रोजी पीडित महिलेने भोपाळच्या छोला मंदिर पोलीस ठाण्यामध्ये एफआयआर दाखल केली. अभिषेक गुप्ता या युवकाने लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप महिलेने केला होता. यात आरोपीची आई आणि भाऊ देखील दोषी असल्याचे पीडितेने म्हटले होते. ८ जुलै २०२१ रोजी आरोपीने पहिल्यांदा पीडितेला घरी बोलवून तिच्यावर जबरदस्ती केली. साखरपुडा झाल्यानंतर अनेकदा तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. लग्नासाठी दबाव टाकल्यानंतर आरोपीने लग्नास नकार दिल्याचे पीडित महिलेने म्हटले.

आरोपीच्या आईने या गोष्टीला प्रोत्साहन दिले होते. तिने लग्नाच्या आधी शरीरसंबंध ठेवणे सामान्य बाब असल्याचे तिने म्हटले होते. यावरुन न्यायालयाने आरोपीची आई आणि भाऊ देखील या गुन्ह्यामध्ये सहआरोपी आहेत असे म्हटले होते. भोपाळ सेशन कोर्टाने या प्रकरणी आरोपी अभिषेक गुप्ताला दोषी ठरवले होते. त्यासोबत आई-भावाला देखील आरोपात भागीदार असल्याचे म्हटले होते. या निकालावरुन आरोपी आणि त्याच्या वकिलांनी हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली होती.

सेशन कोर्टाच्या निकालावर मध्यप्रदेश हायकोर्टाने संमती दर्शवली. यासोबतच हायकोर्टाने आरोपीची आई आणि भावाने बलात्काराच्या घटनेला सहमती दर्शवत त्याला प्रोत्साहन दिल्याचे मान्य केले. त्यांच्यावर कलम 376 r/w 34, 109 और 506-11 अन्वये गुन्हा नोंदवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हा निर्णय बलात्काराच्या प्रकरणांमध्ये नवा कायदेशीर दृष्टीकोन मांडतो, असे पीडितेच्या वकीलांनी म्हटले आहे. याशिवाय जर कोणी महिला बलात्कार करण्यासाठी प्रवृत्त करत असेल, तर तिला देखील शिक्षा होईल असा दावा करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : हवामान बदलामुळे धाराशिव जिल्ह्यामध्ये आंबा उत्पादक शेतकरी अडचणीत

मोठी बातमी! ठोकून काढू, कापून टाकू...ठाकरेंच्या दिग्गज शिलेदाराला धमक्यांचे फोन, थेट नंबरच सांगितला

Gold Rate Today: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोनं स्वस्त, प्रति तोळा इतक्या रुपयांवर आले, वाचा २२ अन् २४ कॅरेटचे दर

Mangalsutra Designs: साडीच नाही तर जीन्स-टॉपवरही दिसेल स्टायलिश! पाहा 'इंडो-वेस्टर्न' मंगळसूत्रांचे 5 युनिक पॅटर्न्स

LPG News Rules: गॅस सिलिंडरच्या नियमात मोठे बदल, आता शहरात २५ दिवसांत LPG मिळणार, तर ग्रामीण भागात...

SCROLL FOR NEXT