देश विदेश

Tina Dabi: गावच्या महिला सरपंचानं केलं भर कार्यक्रमात फाडफाड इंग्लिशमध्ये भाषण, IAS अधिकारी झाल्या आश्चर्यचकित, Viral Video

Tina Dabi Video : व्हिडिओमध्ये एका महिला सरपंचाला इंग्रजीत भाषण करताना पाहून आयएएस अधिकारी टीना दाबी आश्चर्यचकित झाल्यात महिला सरपंचाने राजपूती पोशाख परिधान केला होता.

Bharat Jadhav

आयएएस टीना दाबी अनेकदा तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनाशी संबंधित अनेक कारणांमुळे चर्चेत असतात. युनियन लोकसेवा आयोग (UPSC) 2015 मधील टॉपर राजस्थानमधील विविध जिल्ह्यांमध्ये तिच्या कामासाठी ओळखली जाते. आता त्या एका व्हिडिओमुळे पुन्हा चर्चेत आल्या आहेत.

या व्हिडिओमध्ये त्या एका महिला सरपंचाचं इंग्रजी भाषेमधील भाषण ऐकताना दिसत आहेत. महिला सरपंचाला इंग्रजीत भाषण करताना पाहून टीना दाबी आश्चर्यचकित झाल्या. महिला सरपंचाने राजपुतानी कपडे परिधान केले होते. कपड्यांकडे पाहिलं की, त्या इंग्रजीत भाषण करतील असं कोणालाच वाटलं नव्हतं.

जेव्हा या सरपंच भाषणासाठी स्टेजवर आल्या तेव्हा त्यांनी थेट इंग्रजीतून भाषण सुरू केलं. आजच्या कार्यक्रमात मला सहभगी होता आलं त्याचा मला आनंद आहे. मी जिल्हाधिकारी टीना दाबी यांचं स्वागत करते असं म्हणत महिला सरपंचाने इंग्रजीतून भाषण सुरू केलं. इंग्रजीतील भाषण ऐकताच व्यासपीठावरील पाहुण्यासह टीना दाबी ह्या आश्चर्यचकित झाल्या. भाषण संपल्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांच्या भाषणाचं कौतुक केलं.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या महिला सरपंचाच नाव सोनू कंवर असल्याचं सांगितलं जात आहे. त्यांनी राजस्थानच्या बारनेरमधील कार्यक्रमात भाषण दिलं. तेथे टीना दाबी ह्याचं नुकत्याच बारनेरच्या जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाल्या आहेत. त्याआधी त्यांनी जैसलमेरमध्ये जिल्हाधिकारी म्हणून काम केलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

SCROLL FOR NEXT