Online Dating App
Online Dating App Saam TV
देश विदेश

म्हातारपणात डेटिंगच्या नादात महिलेने गमावले 70 लाख; अशी केली तरुणाने फसवणूक

वृत्तसंस्था

प्रेम ही गोष्ट कधी लपून राहत नाही असे म्हणतात ते खरं आहे. तरुणपणात अनेकांना प्रेम होते ते शेवट पर्यंत टिकते. परंतु असेही म्हणतात म्हातारपणी झालेले प्रेम खूप धोकादायक असते. याचाच प्रत्यत आला आहे. वृद्धापकाळात 'डेटींग'च्या (Online Dating Site) क्रेझने एका महिलेला कंगाल व्हावे लागले आहे. महिलेने या डेटिंगच्या नादात 70 लाख रुपये तर गमावलेच परंतु तिला या प्रेम प्रकरणात म्हतारपणात आपले हक्काचे घरही गमवावे लागले आहे. इतकं करूनही त्या महिलेला ना प्रियकर मिळाला ना प्रेम. सध्या जो कोणी ही कथा ऐकतोय तो त्या वृद्धेला दोष देत आहे.

एका तरुणावर प्रेम करणाऱ्या या वृद्ध महिलेचे नाव कॅथी आहे. स्वतः कॅथीने ABC7 शी काय बोलणे झाले हे सार्वजनीक केले आहे. त्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला. आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्या तरुणाच्या प्रेमप्रकरणात अडकलेल्या महिलेची अवस्था इतकी बिकट झाली आहे की, तिच्यावरील कर्ज फेडण्यासाठी तिला नोकरीतून निवृत्तीची मुदत वाढवावी लागली आहे. कॅथीने ती डेटिंग अॅपच्या विळख्यात अडकल्याचे सांगितले. पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार, ती ऑनलाइन डेटिंग साइटच्या माध्यमातून तरुणाच्या जवळ आली. प्रेम तर मिळाले नाही पण, खोटारडेपणाचा बळी ठरलेल्या कॅथीवर म्हातारपणात फार मोठा धक्का बसला आहे.

आतापर्यंत खोंचे नुकसान अन् झाली कर्जबाजारी

ऑनलाईन प्रियकर मिळवण्याच्या नादात कॅथिने आपले ७० लाख रुपये गमावले आहेत. यासोबतच तिने आपले घरही गहाण ठेवले आहे. .यानंतरही कॅथिचे कर्ज कमी होत नाहीये. यामुळे आता कर्ज फेडण्यासाठी कॅथीने आपल्या डोक्यावरील कर्जाच्या ओझ्यातून मुक्त व्हावे यासाठी नोकरीतून निवृत्तीची वेळ वाढवून घेतली आहे. असे वाईट दिवस दाखवणारा कोणी शत्रू नसून तो कॅथीचा कथित प्रियकर आहे, ज्याच्यामुळे आज कॅथी गरीब झाली आहे. खरं तर, कॅथी ज्याच्यावर प्रेम करत होती ती व्यक्ती तिला खूप आवडली होती.

प्रेयसी नुसती पोरगी करण्यात मग्न होती

कॅथीने म्हातारपणी आपले हृदय एका तरुण प्रियकराकडे सोपवले होते. प्रत्यक्षात कथित प्रियकर, कॅथीपेक्षा खूपच लहान आणि कॅथीला कंगाल करण्यात व्यस्त होता. शक्य तितके पैसे उकळण्याचा प्रयत्न करत होता. उतारवयात तरुणाच्या प्रेमात लुटली गेलेली कॅथी म्हणाली, 'सिल्व्हरसिंगल्स नावाच्या डेटिंग वेबसाइटच्या माध्यमातून मी त्या अनोळखी तरुणापर्यंत पोहोचली होते. जेव्हा मी त्या तरुणाला भेटले तेव्हा मला तो खूप समजूतदार वाटला. ज्या वेबसाइटद्वारे मी या तरुणाला भेटले ती वेबसाइट केवळ पन्नास वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना पार्टनर पुरवण्याचे काम करते. मी पहिल्या भेटीतच त्या तरुणाची फॅन झाले.

अशी झाली फसवणूक

कॅथी पुढे म्हणाली, 'मी त्या व्यक्तीला कधीही समोरासमोर भेटले नाही. तरीही त्याने दूर राहून माझे मन जिंकले होते. जवळ आल्यावर मला त्याच्याशिवाय राहता येणार नाही असं वाटायला लागले होते. त्यामुळे तरुणाने कॅथीकडे रोख रक्कम मागायला सुरुवात केली. आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्या आणि अनोळखी व्यक्तीच्या प्रेमात वेडी झालेली कॅथी सर्व काही विसरून गेली होती. कॅथीने तरुणाला त्याच्या मागणीनुसार मोठी रक्कम पाठवण्यास सुरुवात केली. एके दिवशी कॅथीने त्या तरुणाला भेटण्याचे ठिकाण आणि वेळ ठरवायला सांगितली तेव्हा त्याने नोकरीनिम्मित्त बाहेर जायचे आहे असे म्हणून तरुणाने ती भेट टाळली.

मूर्ख बनवून पैसे गोळा करत राहिला

या तरुणाने पुढे सांगितले की, टोरंटोमध्ये काही दिवस राहिल्यानंतर तेथे वर्क परमिट काढावे लागेल, त्यासाठी वेळ लागेल. यासोबतच वर्क परमिट बनवण्यासाठी त्याने कॅथीकडे चार लाख रोख रुपयांची मागणी केली. त्यामुळे तरुणाच्या प्रेमात वेडी झालेल्या वृद्ध कॅथीने तरुणाने केलेली पैशाची मागणी पूर्ण केली. यानंतर आपला अपघात झाला आहे असे सांगून लाखो रुपये उकळले. कॅथीने तिचे घर गहाण ठेवले आणि हे पैसे तरुणाला पाठवले. दरम्यान, त्या तरुणाच्या प्रेमात वेडी झालेल्या कॅथीने नेटफ्लिक्सवर 'द टिंडर स्विंडलर' हा शो पाहिला. तेव्हा कॅथीचे डोळे उघडले. यानंतर कॅथी आणि त्या तरुणामध्ये वाद विवाद झाले. वृद्धापकाळात कॅथीच्या मनातून प्रेमाचे भूत उतरले तोपर्यंत ती आर्थिकदृष्ट्या गरीब झाली होती.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी चुकूनही करू नका 'हे' काम; नाहीतर येतील आर्थिक अडचणी

Maruti Suzuki च्या या कारवर मिळत आहे 58000 रुपयांची सूट, 34kmpl चा देते मायलेज

iQOO Neo 9s Pro जबरदस्त प्रोसेसरसह भारतात होणार लॉन्च, मिळणार जबरदस्त फीचर्स; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Maharashtra Politics: सत्तेसाठी भाजप आणि काँग्रेसचा छुपा समझौता, सुजात आंबेडकरांचा आरोप

Beed News: 3 वर्ष महाविकास आघाडीच्या सरकारने रेल्वेचा पावणेचारशे कोटींचा निधी अडवला, प्रीतम मुंडेंचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT