CCTV Footage Saam Digital
देश विदेश

CCTV Footage : नवरा- बायकोच भांडण; गोठवणाऱ्या थंडीत चिमुकल्यांना रस्त्यावर सोडून आई पसार, मन सुन्न करणारा VIDEO

Delhi News: पती सोबत असणाऱ्या वादातून जन्मदाता आईने आपल्याच दोन चिमुकल्यांना चुलत बहिणीच्या घराबाहेर सोडून दिले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Jahangirpuri News

दिल्लीमधून मनसुन्न करणारी घटना समोर आली आहे. पती सोबत असणाऱ्या वादातून जन्मदाता आईने आपल्याच दोन चिमुकल्यांना रस्त्यावर सोडून पसार झाली आहे.सध्या सोशल मीडियावर संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल होत असून या बाबतचा अधिकचा तपास पोलिसांकडून करण्यात येतोय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या माहितीनुसार संपूर्ण घटना राजधानी दिल्लीतील जहांगीरपुरीमधील (ता.३१)बुधवार रात्रीची आहे. सालेब बेगम असे चिमुकल्यांच्या आईचे नाव आहे. बेगम या जोडप्याला एक ३वर्षीय मुलगी आणि साधारण एक वर्षाच्या मुलगा आहे.

सालेम आणि तिच्या पतीमध्ये काही दिवसांपूर्वी वाद झाल्यानंतर महिलेचा पती आसामधील त्याच्या गावी गेला मात्र पतीसोबत झालेल्या वादाचा राग सालेमच्या मनात होता. याच रागातून सालेमने आपल्या मुलीला आणि साधारण एक वर्षाच्या मुलाला मध्यरात्री जहांगीरपुरी बी ब्लॉकमध्ये राहणाऱ्या चुलत बहिणीच्या घराबाहेर ठेवून आसामला निघून गेली.

व्हायरल व्हिडिओ

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत दिसते की, सालेब ही तिच्या दोन चिमुकल्यांसह दिसते. बराच वेळ एका ठिकाणी उभी राहिल्यानंतर ती आसपास कोणी तिला बघत आहे का हे पाहते. त्यानंतर ती चिमुकल्यांना जमिनीवर सोडून पळताना दिसते. यानंतर दोन्ही मुले रडत असून आईच्या मागे जाण्याचा प्रयत्न करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,या दोन चिमुकल्यांना पोलिसांनी आसाममध्ये असलेल्या पालकांच्या परत करण्यात आले आहे. मात्र याबाबत कोणतीही कायदेशीर कारवाई झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Worli Dome : वरळी डोममध्ये पाहणीदरम्यान संजय राऊत आणि प्रकाश महाजन यांची गळाभेट | VIDEO

Vijay Melava Worli: वरळी डोममध्ये मराठी सेलिब्रिटींची मांदियाळी, तेजस्विनी पंडितही मेळाव्यात सहभागी|VIDEO

Crime News : 'तो' व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी; बदनामीच्या त्रासाला कंटाळून महिलेनं आयुष्य संपवलं

Worli History: 'वरळी' हे शहर कसे घडले? जाणून घ्या यामागचा रंजक इतिहास

SCROLL FOR NEXT