husband wife News Saam TV Marathi
देश विदेश

पाषाणहृदयी! मोठ्या बहिणीच्या दीरासाठी नवऱ्याची हत्या केली, रात्रभर मृतदेहाशेजारी झोपली

Domestic Crime and Violence : उत्तर प्रदेशातील धक्कादायक प्रकरणात महिलेने दिरासोबतच्या प्रेमप्रकरणातून पतीचा खून केला. हत्या केल्यानंतर ती रात्रभर मृतदेहाशेजारी झोपल्याने खळबळ उडाली आहे.

Namdeo Kumbhar

wife kills husband over affair with brother in law shocking case : दिराच्या प्रेमात वेळी झालेल्या महिलेनं नवऱ्याचा निर्घृण खून केला, त्यानंतर रात्रभर मृतदेहाशेजारीच झोपल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशमधील पिपलौती कला गावातून नवऱ्याचा बायकोनं खून केल्याची अत्यंत धक्कादायक आणि थरकाप उडवणारी घटना घडली. मृत व्यक्तीचे नाव मेहराज असे आहे, तर आरोपी महिलेचे नाव रूही असे आहे. त्यांना पाच आणि तीन वर्षांची मुले आहेत.

मेहराज हा पिपलौती गावात गवंडी म्हणून काम करत होता. सहा वर्षांपूर्वी मेहराज आणि रूही यांचं लग्न झाले होते. पण लग्नानंतरही रूहीचे प्रेमसंबंध कायम होते. रूहीचं मोठ्या बहिणीच्या दिरासोबत अनैतिक संबंध होते. फरमानसोबतच्या प्रेमप्रकरणातूनच रूहीने पतीला संपवण्याचा कट रचला. पतीची हत्या केल्यानंतर रुही रात्रभर त्याच्या मृतदेहाशेजारीच शांतपणे झोपून राहिली. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली .

स्थानिक मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, मागील सात दिवसांपासून मेहराज आणि रूही या पती-पत्नीमध्ये वाद सुरू होते. रूहीने मेहराजला जेवण देणेही बंद केले होते. त्यामुळे तो नातेवाईकांकडे जेवायला जात होता. हत्येच्या रात्री गावात लग्नसमारंभ असल्याने मोठ्या आवाजात डीजे वाजत होता. याच गोंगाटाचा फायदा घेत रूहीने आपल्या प्रियकराच्या मदतीने मेहराजची गळा चिरून हत्या केली.

मेहराजची हत्या करण्याआधी रूहीने त्याला गुंगीचे औषध दुधात दिले असावे, असा अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. जेणेकरून मेहराजला प्रतिकार करता येणार नाही. त्यानंतर त्याचे हात-पाय बांधून गळा दाबला अन् धारदार शस्त्राने वार करण्यात आले. हत्येचा हा प्रकार इतका क्रूर होता की, ज्या खाटेवर मेहराजची हत्या झाली, त्याच खाटेवर त्याचा पाच वर्षांचा मुलगाही झोपला होता. सकाळी उठल्यावर बापाचा मृतदेह आणि रक्ताने माखलेले स्वतःचे कपडे पाहून मुलगा हादरून गेला.

पतीची निर्घृण हत्या केल्यानंतर रूहीने पळून जाण्याचा प्रयत्न केला नाही. अथवा कोणाला माहितीही दिली नाही. ती आपल्या दोन्ही मुलांसह त्या रक्ताळलेल्या मृतदेहाशेजारीच रात्रभर झोपून राहिली. सकाळी जेव्हा सासरे घरी आले, त्यावेळी मुलांसोबत बसून रूहीने रडण्याचे नाटक केले. पण पोलिसांच्या चौकशीत आणि घटनास्थळावरील पुराव्यांवरून हे कृत्य उघडकीस आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GT vs MI: अखेर मुंबई इंडियन्सला विजय मिळाला; तिलक आणि अश्विनीनं गुजरातचा धुव्वा उडवला

IAS Transferred : २४ IAS अधिकाऱ्यांसह १० जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या धडाधड बदल्या, युपीच्या प्रशासकीय वर्तुळात खळबळ

Salary: सरकारी कर्मचाऱ्यांना एकाच महिन्यात दोन वेळा पगार मिळणार, 'या' देशानं घेतला मोठा निर्णय

Rain Alert in Maharashtra : महाराष्ट्रात पुढील ५ दिवस वादळी पाऊस; या जिल्ह्यांना हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

अमेरिका-इराण युद्ध पुन्हा पेटणार? अमेरिकेच्या कुरापतीमुळे इराणचा संताप

SCROLL FOR NEXT