Viral Video
Viral Video Saam TV
देश विदेश

Viral Video: धावत्या ट्रेनमधून महिला अचानक खाली कोसळली; आरपीएफ जवानानं वाचवले प्राण

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Viral Video:अति घाई संकटात नेई, असं म्हणतात. मात्र ही म्हण माहित असली तरी त्याप्रमाणे वागणं लोक अनेकदा विसरतात. रेल्वे पकडण्याची घाई तर अनेकांच्या जीवावर बेतली आहे. मात्र तरीही लोक त्यातून काही धडा घेताना दित नाहीत. अशीच एक घटना अकोला येथे घडली आहे. धावती ट्रेन पकडण्याच्या नादात एक महिला रेल्वेखाली जाता जाता वाचली आहे. आरपीएफ जवानाच्या प्रसंगावधानामुळे महिलेचा जीव वाचला आहे.

भारतीय रेल्वेकडून धावती ट्रेन (Train) पकडू नये अशा सूचना वारंवार दिल्या जातात. मात्र तरी देखील अनेकजण धावती ट्रेन पकडतात. यात तोल गेल्यावर आपल्या जिवाचे काही बरे वाईट होऊ शकते असा कोणताही विचार न करता धावती ट्रेन पकडतात. आतापर्यंत यामुळे अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत. अशात सोशल मीडियावर सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

अकोला येथे एक महिला रेल्वे अपघातात थोडक्यात बचावली आहे. महिला काचीगूडा एक्सप्रेस पकडत असताना तिचा तोल गेला आणि ती खाली पडली. महिला रेल्वे खाली जाण्याची भीती होती. मात्र त्यावेळी प्लॅटफॉर्मवर असलेल्या आरपीएफ जवानांनी देवदूतासारखं धावून जात तिचा जीव वाचवला.

सदर घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. बी. आर. धुर्वे असं महिलेचा जीव वाचवलेल्या आरपीएफ जवानाचं नाव आहे. अक्षय बैसाणे यांनी त्यांच्या ट्वीटर (Twitter) अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. तसेच नेटकरी आरपीएफ जवानाने दाखवलेल्या प्रसंगावधानाचं कौतुक करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amit Shah : अमित शाह यांच्या Deepfake व्हिडिओ प्रकरणी दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; ट्विटर हॅण्डल चालवणाऱ्या एकाला अटक

Contractors Engineer: राज्यातील अभियंता कंत्राटदार ७ मे पासून करणार काम बंद

Today's Marathi News Live : ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी मुख्यमंत्र्यांनी कंबर कसली

Sanjay Nirupam Joins Shinde Group | संजय निरूपम यांचा शिंदे गटात प्रवेश

Pravin Darekar On Amol Kolhe | अमोल कोल्हेंबाबत मोठा गौप्यस्फोट!

SCROLL FOR NEXT