Viral Video Google
देश विदेश

Ram Aayenge: कडाक्याच्या थंडीत 'राम आयेंगे'च्या तालावर महिलेनं धरला ठेका, व्हिडिओ व्हायरल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Woman Dance On Ram Aayenge Song

थंडी थोडी जाणवायला लागली की, आपले नखरे सुरू होतात. आपण बिछान्यातून बाहेर पडायलाही तयार नसतो, अशा वेळी नाचणं तर काय आपण साधं बाहेर जाणंही टाळतो. पण अशा परिस्थितीमध्ये सोशल मिडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय. या व्हायरल व्हिडिओमध्ये एक महिला कडाक्याच्या थंडीत राम आयेंगे' या गाण्यावर नृत्य करताना दिसत आहे. या व्हिडिओबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊ या. (Latest Marathi News)

अयोध्येत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडलाय. त्यामुळे भक्तांमध्ये अनोखा उत्साह संचारल्याचं दिसतंय. संपूर्ण जग राममय झाल्याचं दिसत (Ram Aayenge Viral Video) आहे. जिकडे पाहावं तिकडे रामाचं भजन सुरू आहे. सगळीकडे प्रभु श्रीरामांचा जयघोष सुरू आहे. सोशल मिडियावरही याचं वादळ उठलंय. प्रत्येकजण आपापल्या पद्धीतीने हा आनंद साजरा करत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओ

काही ठिकाणी 'जय श्री राम'चा नारा तर काही ठिकाणी भगवान श्रीरामाच्या भजनांचं आयोजन करण्यात येत आहे. सोशल मीडियावर प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने राम मंदिर स्थापनेचा आनंद साजरा करताना दिसतोय.

अशा परिस्थितीत सोशल मीडियावर एक व्हिडिओ (Ram Aayenge) व्हायरल होत आहे. तो पाहून लोकं आश्चर्यचकित होत आहेत. वास्तविक, हा व्हिडिओ अमेरिकेतील असल्याचं सांगितलं जातंय. व्हिडिओमध्ये एक महिला राजस्थानी पोशाखात 14 डिग्रीच्या थंडीत बर्फाच्या मध्यभागी 'राम आयेंगे' गाण्यावर नाचताना दिसत आहे.

ही महिला अगदी आनंदाने नाचत आहे. रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचा आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसत आहे. अगदी उत्कृष्ट पद्धतीने हावभाव करत तिने या गाण्यावर ठेका धरलाय. तिचा पेहराव गाण्याला अगदी साजेसा आहे. तिचा हा व्हिडिओ (Ram Aayenge Viral Video) सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला आहे. लोकांना तो खूप आवडला आहे.

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सर्वजण त्या महिलेचं कौतुक करत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामच्या preetanjalibaghel25 अकाउंटवर शेअर करण्यात आलाय. सोशल मीडियावर लोकं या व्हिडिओला खूप पसंत करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर विमानतळवर दाखल

Rashmika Mandanna: श्रीवल्लीचा स्टनिंग लूक; ब्लॅक आऊटफिटमध्ये केला कहर

5 Laws for Woman : प्रत्येक महिलेला 'हे' ५ कायदे माहीत असलेच पाहिजेत

Maharashtra Politics : काँग्रेसचा १२५ जागांवर दावा, कुठे किती जागा मागितल्या?

IND vs BAN: पहिल्याच डावात केलेल्या या 3 चुका टीम इंडियाला महागात पडू शकतात

SCROLL FOR NEXT