Vasundhara Raje Rajasthan Cm Candidate Saam Tv
देश विदेश

Rajasthan New CM: वसुंधरा राजे याच मुख्यमंत्री होणार? आमदारांनी लावली त्यांच्या घरी रांग, हायकमांडचं टेन्शन वाढणार?

Rajasthan BJP CM Face: वसुंधरा राजे याच मुख्यमंत्री होणार? आमदारांनी लावली त्यांच्या घरी रांग, हायकमांडचं टेन्शन वाढणार?

Satish Kengar

Vasundhara Raje Rajasthan CM Candidate:

राजस्थानमध्ये भाजपला बहुमत मिळाले असले तरी मुख्यमंत्रीपदाबाबत संभ्रम कायम आहे. मात्र, निवडणूक जिंकल्यानंतर दुसऱ्याच दिवशी माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या घरी आमदारांची गर्दी वाढली होती.

अनेक आमदार वसुंधरा राजे यांच्या घरी पोहोचल्यानंतर त्यांनी भाजप हायकमांडला आपली ताकद दाखवण्यासाठी हे शक्तिप्रदर्शन केलं असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. यातच मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत अनेक नवीन चेहऱ्यांची चर्चा आहे. यातच केंद्रातील भाजपच्या बड्या नेत्यांनी बुधवारी वसुंधरा राजे यांच्याशी चर्चा केली. या चर्चेनंतर पुन्हा एकदा त्याच राजस्थानच्या मुख्यमंत्री होतील, या चर्चांना उधाण आलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप हायकमांडने राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्याशी फोनवर चर्चा केली आहे. संवादादरम्यान वसुंधरा राजे यांनी भाजप हायकमांडला सांगितले की, पक्ष जे काही सांगेल ते स्वीकारण्यास तयार आहे. (Latest Marathi News)

भाजपने निवडणूक जिंकल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तिजाराचे आमदार योगी बालकनाथ दिल्लीत पोहोचले होते. त्याच दिवशी संध्याकाळी 30 हून अधिक आमदार वसुंधरा राजे यांच्या घरी पोहोचले होते. आम्ही राजा यांचे अभिनंदन करण्यासाठी आलो असल्याचे अनेकांनी सांगितले होते. तर काहींनी त्यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची मागणी केली होती. बालकनाथ यांच्याशिवाय दिया कुमारी, राज्यवर्धन सिंह राठौर, किरोरी लाल मीना आणि काही केंद्रीय मंत्रीही राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत.

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांसह महामंत्र्यांची बैठक

बुधवारी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांसोबत महामंत्र्यांची बैठक झाली. त्यात अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. 5 निवडणूक राज्यांचे विश्लेषण, विकास भारत संकल्प अभियान, विश्वकर्मा योजना आणि मेरा युवा भारत अभियान यावर चर्चा करण्यात आली. यासोबतच सोशल मीडिया रोड मॅप, कॉल सेंटर विस्तार योजना, लोकसभा स्थलांतर योजना, अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीशी संबंधित कार्यक्रमांवरही चर्चा करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivani Rangole: टिव्हीतल्या 'मास्तरीणबाई' चं सौंदर्य लाखात एक, फोटोंवर लाईक्स

Maharashtra Live News Update: खराडी पार्टीवर केलेली कारवाई राजकीय दृष्टिकोनातून करण्यात आली नाही ना? - रोहित पवार

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

SCROLL FOR NEXT