Crime News saam tv
देश विदेश

Andhra Crime News : पती पहिल्या पत्नीचे इन्स्टाग्रामवर बघत होता रील्स, दुसरी पत्नी संतापली अन् गुप्तांगच कापलं

Crime News : आंध्र प्रदेशातील एनटीआर जिल्ह्यातील आहे.

साम टिव्ही ब्युरो

Andhra Pradesh News : आंध्र प्रदेशमधून घरगुती हिंसाचाराची विचित्र आणि तितकीच भयानक घटना समोर आली आहे. एका महिलेने आपला पती पहिल्या पत्नीचे इंस्टाग्रामवरील व्हिडीओ पाहत होता म्हणून त्याचं गुप्तांगचं कापलं आहे. आंध्र प्रदेशातील एनटीआर जिल्ह्यातील आहे.

पोलीस अधिकाऱ्यांना दिलेल्या माहितीनुसार, पीडित पती आनंद बाबूने पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर पाच वर्षांपूर्वी वरम्मा नावाच्या महिलेसोबत लग्न केलं होतं. वरम्मा अनेकदा आनंद बाबूला त्याच्या पहिल्या पत्नीला इन्स्टाग्रामवर फॉलो करण्याबद्दल आणि दररोज तिचे रील पाहण्यासाठी आक्षेप घेत असत.

शनिवारी २२ जुलै रोजी सकाळी वरम्मा पती आनंद बाबू मोबाईलमध्ये काहीतरी पाहत असल्याची लक्षात आले. तिने जवळ जाऊन पाहिले पती पहिल्या पत्नीचे इन्स्टाग्राम रील्स पाहत होता. (Latest News)

वरम्माचा हे पाहून राग अनावर झाला आणि यानंतर पती-पत्नीमध्ये जोरदार वाद सुरू झाला. वादाचं रुपांतर हाणामारीत झालं. संतापलेल्या पत्नीने पतीवर ब्लेडने वार करून त्याचं गुप्तांगच कापलं. (Viral News)

आरडाओरडा ऐकून आजूबाजूचे तिथे पोहोचले. लोकांनी आनंदला तातडीने सरकारी रुग्णालयात नेले आणि नंतर उपचारासाठी विजयवाडा येथे पाठवण्यात आलं. डॉक्टरांनी कापलेल्या भागाला टाके घालून जोडले आहे. त्याची प्रकृती स्थिर असताना रुग्णालयातूनही डिस्चार्ज देण्यात आला. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गणपतीत 5 दिवस नक्की खा या 5 गावरान भाज्या; ज्या चवीसोबतच आरोग्यासाठीही आहेत वरदान!

Maharashtra News Live Update: मुंबई गोवा महामार्गाचे काम आद्यपही अपूर्णच

Success Story: डोंबिवलीच्या अदितीची आकाशाला गवसणी! १६ लघुग्रहांचा शोध, नासाने घेतली ३ ग्रहांची दखल

कुणी लग्नासाठी मुलगी देता का? 28 वर्षीय शेतकरी तरुणाचे जिल्हा परिषदेसमोर आंदोलन

Mumbai Local Accident: गर्दीच्या रेटारेटीत लोकलमधून महिला खाली पडली|VIDEO

SCROLL FOR NEXT