Crime Saam Tv
देश विदेश

Extra Marital: नवरा परस्त्रीसोबत हॉटेलच्या बेडवर, पत्नीने रंगेहाथ पकडलं; पतीने लोखंडी रॉडनं पत्नीचं नाकच फोडलं अन्..

Ghaziabad Domestic Violence: एका महिलेने आपल्या पतीला दुसऱ्या महिलेसोबत आक्षेपार्ह अवस्थेत पकडल्यानंतर, पतीने पत्नीवर लोखंडी पाईपने हल्ला करत नाक फोडलं.

Bhagyashree Kamble

आता एक संतापजनक बातमी गाझियाबादमधून समोर येत आहे. एका हॉटेलमध्ये महिलेने आपल्या पतीला दुसऱ्या महिलेसोबत आक्षेपार्ह स्थितीत पकडले आहे. याचा पत्नीने जाब विचारल्यानंतर तिला लोखंडी पाईपने मारहाण केली आहे. तसेच सासूचे डोके फोडले आणि मेहुण्यावर ब्लेडने वार केले आहे. ही धक्कादायक घटना १४ मे रोजी घडली असून, रविवारी पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपासाला सुरूवात केली आहे.

सायबा असे पीडित महिलेचे नाव आहे. तिचा १४ वर्षांपूर्वी विवाह झाला होता. सायबाने पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, आरोपी आरिफचे वागणे सुरूवातीपासून संशयास्पद होते. तो सातत्याने अन्य महिलांशी संबंध ठेवत असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच त्यांच्यावर पैसे खर्च करत असे. याशिवाय त्याने सायबाचा हुंड्यासाठी छळ केला. आरोपीने सासरच्या मंडळींकडे जमिनीचा तुकडा मागितला. मात्र, त्यांनी दिला नसल्यामुळे त्याने स्वत:चं घर विकून तिला हिमाचलमध्ये नेलं. तसेच भाड्याच्या खोलीत ठेवलं. नंतर भाड्याच्या खोलीतूनही हाकललं.

सायबा त्यानंतर पुन्हा गाझियाबादला आली. आरिफ पुन्हा गाझियाबादला परतला आणि कारखान्यात काम करू लागला. पण त्याचे बाहेरचे संबंध सुरूच होते. १४ मे रोजी आरिफने सायबाच्या भावाची स्कूटर घेतली आणि हॉटेलला गेला. पीडितेच्या भावाने स्कूटी एका हॉटेलबाहेर उभी असल्याचं त्याने सांगितलं. त्याने सायबाला याची माहिती दिली.

सायबा आणि तिची आई हॉटेलमध्ये गेल्यावर त्यांनी आरिफला दुसऱ्या महिलेसोबत आक्षेपार्ह स्थितीत पकडले. त्यानंतर आरिफने पत्नीला लोखंडी पाईपने मारून तिच्या नाकाचे हाड मोडले, सासूचे डोके भिंतीवर आपटून जखमी केले आणि मेहुण्याच्या पायावर ब्लेडने हल्ला केला. या घटनेनंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच आरोपी आरिफविरोधात तक्रार दाखल केली. पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uddhav Thackeray Video: 'जय गुजरात'; नारा देताना उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडिओ शिवसेनेकडून व्हायरल

Pandharpur : विठुरायाच्या पद स्पर्शासाठी ५ किमीपर्यंत लांबच लांब रांगा | VIDEO

Maharashtra Live News Update: भारंगी नदीत वृद्धाने घेतली उडी; घटना सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद

Hindi Language Row: आर्थिक गणित जुळवण्यासाठी व्यापाऱ्यांना त्रास, खंडणी नाही दिली म्हणून...; प्रताप सरनाईकांचे मनसैनिकांवर गंभीर आरोप|VIDEO

Nashik Crime : लूटमारीच्या उद्देशातून हत्या; चामर लेणी येथील ट्रक चालकाच्या खुनाचा उलगडा

SCROLL FOR NEXT