Viral VIdeo
Viral VIdeo Saamtv
देश विदेश

Viral Video: बिचारा रे! ऑफिसवरुन दमून आला अन् घरात पाऊल ठेवताच बायकोने लाथा बुक्क्यांनी धू धू धूतला; VIDEO व्हायरल

Gangappa Pujari

Husband Wife Viral Video: सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ मनोरंजनात्मक असतात, तर काही व्हिडिओ आश्चर्यचकित करणारे असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. या व्हिड़िओमध्ये कामावरून घरी आलेल्या नवऱ्याला बायकोने धु धु धुतल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काय आहे या व्हायरल व्हिडिओची कथा, चला जाणून घेवू.. (Wife Attack On Husband)

नवरा-बायको म्हणलं की भांडण हे आलेच. छोट्या छोट्या कारणांवरुन अनेकदा पती पत्नीत भांडण होत असतात, हे भांडण कधीकधी टोकाला पोहोचते. अशाच एका भांडणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. पण, हा व्हिडिओ इतर व्हिडिओंपेक्षा वेगळा आहे, कारण यात बायको नवऱ्याची धु-धु धुलाई करताना दिसत आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. (Latest Marathi News)

या व्हायरल व्हिडिओमध्ये (Viral Video) एक व्यक्ती कामावरुन(ऑफिसमधून) घरी येतो. घरात पाऊल ठेवताच यावेळी अचानक त्याची बायको त्याच्यावर तुटून पडते. ती त्याला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण करते. ही संपूर्ण घटना घरात लावलेल्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मारहाणीसह बायको त्याला शिवीगाळही करताना दिसत आहे. हा व्हिडिओ ट्विटरवर Crazy Clips नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.

या मारहाणीमागे नेमके काय कारण असावे असाच प्रश्न प्रत्येकाला पडल्याचे दिसत आहे. अनेकांनी पती उशिरा आल्याने पत्नी संतापल्याचे म्हटले आहे. तर काही जणांनी तो जाताना कचऱ्याचा डबा विसरून गेल्याने बायकोने धुतल्याचे सांगितले आहे.

दरम्यान, हा व्हायरल व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी बिचाऱ्या नवऱ्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली आहे. तर काही जणांनी भावा आम्हीही हे सहनं केलयं म्हणत आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. आत्तापर्यंत हा व्हिडिओ 5.78 लाखाहून अधिक नागरिकांनी पाहिला आहे. तसेच व्हिडिओ 29 जानेवारी 2023 चा असल्याची माहिती आहे. या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडतोय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RCB vs CSK IPL 2024 : बेंगळुरूची प्लेऑफमध्ये एन्ट्री पक्की; चेन्नई आयपीएलमधून बाहेर

Indian Politics 2024 : भाजप झाला मोठा संघ झाला छोटा;'आधी RSS ची गरज, आता भाजप सक्षम'

Crime News: युट्यूब पाहून छापल्या लाखोंच्या बनावट नोटा; 9 वी पास तरुणाचा कारनामा

Maharashtra Politics: 'नावं द्या त्या पोलिसांना बघतो मी', उद्धव ठाकरेंनी भरला पोलिसांना दम; मुलुंडच्या राड्यावरून ठाकरेंचा संतापले

Kalyan Crime News : यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीवर ज्वलनशील पदार्थ लुटलं, कल्याणमधील घटनेने खळबळ

SCROLL FOR NEXT