Rajasthan Crime
Rajasthan Crime Saam Tv
देश विदेश

पत्नीला नातेवाईकांच्या हवाली केलं, बलात्कार होत असताना नराधम पतीकडून घटनेचं चित्रण

साम वृत्तसंथा

जयपूर: हुंडा न दिल्याने पत्नीवर स्वत:च्या नातेवाईकांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना राजस्थानमधील भरतपूरमध्ये समोर आली आहे. त्या पीडितेचा पती या बलात्काराचा व्हिडिओ (Video) बनवत असल्याची माहिती समोर आली आहे. हुंडा न दिल्याचा राग मनात धरून त्याने पत्नीवर दोन नातेवाईकांकडून बलात्कार केला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ पतीने बनवला. तो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी त्याने पत्नीला दिली. पती विरुध्द पत्नीने पोलिसात (Police) गुन्हा दाखल केला आहे.

पीडितेने कामण पोलीस (Police) ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. तिने पोलिसांना सांगितले की, २५ मे २०१९ रोजी हरियाणातील पूना येथे त्यांचे लग्न झाले होते. लग्नानंतर काही दिवसातच सासरच्यांनी तिचा हुंड्यासाठी छळ सुरू केला. मामाकडून दीड लाख रुपयांची मोटारसायकल घेण्यासाठी सतत दबाव येत होता. हुंडा ना दिल्यामुळे सासरच्यांनी तिला घरातून हाकलून दिले होते. तेव्हापासून ती तिच्या माहेरच्या घरी राहत होती.

सहा महिन्यानंतर पती घरी आला आणि तिला सोबत घेऊन परत गेला. काही दिवसांनी दोन नातेवाईक घरी आले. दोघांनी तिच्यावर बलात्कार केला. यावेळी पतीही घरी होता, पतीने याचा व्हिडिओ बनवला आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल करून हुंड्याच्या पैशाची कमतरता पूर्ण करणार असल्याचे सांगितले. पतीच्या छळाला कंटाळून महिलेने पोलीस ठाणे गाठून पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलिसांनी (Police) तपास सुरू केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ahmednagar Lok Sabha: शरद पवार गटाविरोधात भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार; नेमकं कारण काय?

Shivsena News: शिवसेना ठाकरे गटाला एकाच दिवसात दोन मोठे धक्के; मढवी यांना अटक तर मोरेंवर तडीपारी...

Horoscope Today: शुक्र ग्रहाचे मेष राशीत संक्रमण, मेष ते मीन राशींवर काय होणार परिणाम? वाचा राशिभविष्य...

Maharashtra Politics 2024 : नाशिकच्या रिंगणात साधू-महंतांचा 'मेळा'?; स्वामी, महंतांनी लोकसभेसाठी कंबर कसली!

LSG sv RR : राजस्थानची विजयी घोडदौड कायम; लखनौवर ७ गडी राखून मिळवला विजय

SCROLL FOR NEXT