Modi Government  Saam tv
देश विदेश

Modi Government : मोदी सरकारचं ८ दिवसांनी विशेष अधिवेशन; महिनाभरानं पावसाळी अधिवशेन, दोन्ही अधिवेशनात इतकं अंतर का?

Modi Government News : मोदी सरकारचं ८ दिवसांनी विशेष अधिवेशन होण्याची शक्यता आहे. त्यानंतर महिन्याभराने पावसाळी अधिवेशन होण्याची शक्यता आहे. या दोन्ही अधिवेशनात इतकं अंतर का असतं, याविषयी जाणून घेऊयात.

Pramod Subhash Jagtap

नवी दिल्ली : देशातील लोकसभा निवडणुकीत बहुमत मिळवत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सत्तेवर विराजमान झाली आहे. आज सोमवारी सकाळी नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर आता मोदी सरकारने दोन दिवसांचं विशेष अधिवेशन बोलवलं आहे. तर या अधिवेशनानंतर महिन्याभराने संसदेचं पावसाळी अधिवेशन होणार आहे. या दोन्ही अधिवेशनात इतकं अंतर का, यावरून चर्चा सुरु झाली आहे.

नरेंद्र मोदी यांनी आज देशाच्या पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारला. मोदींनी कार्यभाराच्या पहिल्याच दिवशी किसान निधीच्या १७ व्या हप्त्याला मंजुरी दिली. तसेच आज मोदींच्या मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत खातेवाटप होणार आहे. तर मोदींनी पंतप्रधान पादाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर १८ जूनला संसदेचं विशेष अधिवेशन सुरु होण्याची शक्यता आहे. आज होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय होणार आहे.

संसदेचं लवकरच विशेष अधिवेशन

संसदेतील विशेष अधिवेशन हे दोन दिवसांचं असणार आहे. या विशेष अधिवेशनात खासदारांची ओळख होते. या अधिवेशनानंतर संसदेचं पावसाळी अधिवेशन आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन हे पुढील महिन्यात होणार आहे. या दोन्ही अधिवेशनात अंतराविषयी सर्वत्र चर्चा होत आहे. मात्र, हीच कामकाजाची पद्धत असल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात तिसऱ्यांदा एनडीए सरकारची स्थापना होणार आहे. तिसऱ्या टर्ममध्ये सर्वात मोठं मंत्रिमंडळ पाहायला मिळालं. आज सायंकाळी पाच वाजता मंत्रिमंडळाची पहिली बैठक होणार आहे. पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्रिमंडळात खातेवाटप होण्याची शक्यता आहे.

मोदींच्या मंत्रिमंडळात २८ ओबीसींची समावेश

पंतप्रधान मोदी यांच्या मंत्रिमंडळात ३० कॅबिनेट मंत्री असतील. तर ५ स्वतंत्र्य राज्य कारभार आणि ३६ राज्यमंत्री असणार आहेत. मंत्रिमंडळात २४ राज्यांना स्थान मिळालं आहे. मोदींच्या कॅबिनेटमध्ये २८ ओबीसी, १० एससी, ५ एसटी आणि ५ अल्पसंख्याक असल्याची माहिती हाती आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मराठा आरक्षण प्रकरणी सरकार अॅक्शन मोडवर; जरांगेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर खलबतं सुरू

BRICS साठी 2 डझन देश एकत्र; भारताच्या नेतृत्वात झाले 5 मोठे निर्णय

Maharashtra News Live Update: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची उद्या दुपारी महत्त्वाची पत्रकार परिषद

Marathi Actress: गाडी अडवली, पैसे मागितले अन् मारहाण केली...; 'लागिरं झालं जी' फेम अभिनेत्रीसोबत पुण्यात धक्कादायक प्रकार

Maharashtra Politics: अर्धा तास चर्चा नंतर एकाच कारमधून प्रवास; शिंदे आणि शहांमध्ये शिजतंय काय? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT