ट्विटरवर का ट्रेंड होतोय #सवालों_से_डरती_मोदी_सरकार saam tv news
देश विदेश

ट्विटरवर का ट्रेंड होतोय #सवालों_से_डरती_मोदी_सरकार

देशात सध्या पिगासस प्रकरण (pegasus case) चांगलेच तापले आहे.

Anuradha Dhawade

देशात सध्या पिगासस प्रकरण (pegasus case) चांगलेच तापले आहे. काल राहूल गांधी (Rahul Gandhi) यांनी पिगासस प्रकरणावरुन मोदी सरकारवर (Modi Government) आरोप केल्यानंतर आज ट्विटरवर #सवालों_से_डरती_मोदी_सरकार हा ट्रेंड व्हायरल होत आहे. ट्विटरवर अनेकांनी #सवालों_से_डरती_मोदी_सरकार हॅशटॅग अंतर्गत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. (Why is it trending on Twitter #Modi_government_fear_questions )

ट्विटर युजर देवाशिष यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर #सवालों_से_डरती_मोदी_सरकार असा हॅशटॅग देत पेगासस खरेदी केले, हो की नाही, असे विचारला आहे.

तर पंजाब प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे कार्यकारी अध्यक्ष कुलजीत नागरा यांनी देखील पिगासस प्रकरण आणि केंद्रीय कृषी कायदे आणि देशभरात सुरु असलेल्या समस्यांविषयी मोदी सरकारवर निषाणा साधला आहे. मोदी सरकारला सामान्य माणसाच्या आयुष्यात होणाऱ्या त्रास आणि उलथापालथांबद्दल सरकारकडे उत्तर नाही. कोणत्याही वादविवादाचा सामना करण्यास भीती वाटते हेच कारण आहे! असे म्हणत #सवालों_डरती_है_मोदी_सरकार दिला आहे.

मोदी सरकार पिगाससमध्ये सामील आहे? मग चौकशी का नाही? असा सवाल चिन्मयीने विचारला आहे. तसेच तिने एक फोटो पोस्ट करत संसदेत पिगासस प्रकरणावर चर्चा करण्यासाठी मोदी सरकार तयार नाही असे म्हटले आहे.

दरम्यान डॉ. अभिषेक सिंघवी यांनी देखली पिगासस प्रकरणावरुन मोदी सरकारवर निषाणा साधला आहे. पिगास प्रकरणी मोदी सरकार उत्तर द्यायला तयार नसल्याचे म्हटले आहे. तुम्ही पिगासस नावाचे सॉफ्टवेअर खरेदी केले होते का किंवा त्याचा वापर केला होता का, आणि दुसरा प्रश्न असा की, जर तुम्ही त्याचा वापर कोणत्याही विशेष व्यक्ती किंवा संस्थेसाठी केला असेल तर तो कोणासाठी केला याचे उत्तर द्यावे. पण सरकारने कोणत्य़ाही प्रश्नाचे उत्तर दिले नाही. उत्तर देण्याऐवजी त्यांनी प्रश्नच चुकीचा असल्याचे आरोप केल्याचे म्हटले आहे.

Edited By- Anuradha

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tridashansh Yog: अवघ्या काही तासांनी गुरु-बुध तयार करणार त्रिदशांश योग; 'या' राशींच्या नशीबी येणार अखेर श्रीमंती

Jalna News: मोठी बातमी! महानगरपालिकेच्या आयुक्तांना १० लाखांची लाच घेताना अटक

Bjp vs Shivsena: दिवाळीआधीच महायुतीत वादाचे फटाके, 'ठाण्यात भाजपचा महापौर होणार' भाजपचा स्वबळाचा नारा

Nashik Politics: नाशिकमध्ये भाजपची जबरदस्त खेळी; कोकाटेंचा भाजपमध्ये प्रवेश

Kalyan News : कल्याण डोंबिवली शहर रात्री प्रकाशमय होणार; महापालिकेने घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT