Uttarakhand CM Yet To Be Declared  SaamTvNews
देश विदेश

उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची लागणार वर्णी?

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचेही नाव चर्चेत

वृत्तसंस्था

डेहराडून : उत्तराखंडचा (Uttarakhand) पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत सध्या राजकीय पातळीवर संभ्रम निर्माण झाल्याचे चित्र आहे. 47 जागा जिंकूनही कोणाला मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसवायचे यावरून भाजप संभ्रमात असल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्रीपदासाठी फिल्डिंग लावलेल्या उत्तराखंडमधील भाजप नेत्यांच्या दिल्ली वाऱ्या जोरात सुरु असून याचे अनेक राजकीय अर्थही काढले जात आहेत. दरम्यान, मुख्यमंत्रीपदावरून भाजप हायकमांडच्या तीन फॉर्म्युल्यांची सर्वाधिक चर्चा सुरु आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांचा निवडणुकीत पराभव झाला होता. (Who Will Be The Next CM Of Uttarakhand?)

फॉर्म्युला-1 : उत्तरप्रदेश, गोवा आणि मणिपूर राज्यांप्रमाणेच उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्रीपदाची पुनरावृत्ती

Uttarakhand chief minister Pushkar Singh Dhami

5 राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकीत यूपी, गोवा, मणिपूर आणि उत्तराखंड या 4 राज्यांमध्ये पुन्हा भाजपचे सरकार आले आहे. यूपी, गोवा, मणिपूरमध्ये आधीच्याच मुख्यमंत्र्यांना पुन्हा संधी दिली जाणार आहे. उत्तराखंडमध्ये मात्र अद्यापही मुख्यमंत्री पदाचा चेहरा स्पष्ट झालेला नाही. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी राजीनामा दिला असून नवीन मुख्यमंत्री शपथ घेत नाहीत तोपर्यंत कायद्याप्रमाणे त्यांच्याकडे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी आहे. मुख्यमंत्री धामींचा निवडणुकीत पराभव झाल्याने त्यांना पुन्हा संधी दिली जाईल का? याबाबत शंका आहे. मात्र, निवडणुकीत विजयी झालेले अर्धा डझनहून अधिक आमदार धामी यांच्या बाजूने असल्याची माहिती आहे. अशा परिस्थितीत धामी पुन्हा मुख्यमंत्री होण्याची शक्यता प्रबळ दिसत आहे. त्यामुळे अशा स्थितीत भाजपा हायकमांड अद्यापही कोणत्याही निर्णयापर्यंत आल्याचे दिसत नाही.

फॉर्म्युला 2 : हिमाचलप्रमाणे उत्तराखंडमध्ये नवा चेहरा

पुष्कर सिंह धामी यांच्याकडे जर पुन्हा सूत्रे सोपवली तर भाजपमध्ये अंतर्गत अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत. पराभवानंतरही धामी यांना मुख्यमंत्री करायचे का? असा प्रश्न भाजपमधील काहीजण उपस्थित करत आहेत. जेव्हा संघ सामना जिंकतो तेव्हा ट्रॉफी कर्णधाराच्या हातात दिली जाते. भलेही कर्णधार चांगला खेळू शकला नसला तरीही! असाही काहींचा सुरु असल्याचे चित्र आहे. हिमाचल प्रदेशमध्ये भाजपने प्रेमकुमार धुमल यांच्या चेहऱ्याचा वापर करून निवडणूक लढवली पण धुमल निवडणूक हरले, त्यानंतर त्यांच्या जागी जयराम ठाकूर यांना मुख्यमंत्री करण्यात आले. अशा स्थितीत उत्तराखंडमध्ये पक्षात वजन असणाऱ्या अन्य कोणत्याही नेत्याची मुख्यामंत्रीपदी लॉटरी लागू शकते. सोबतच यूपीमध्ये निवडणूक हरल्यानंतरही कैशव प्रसाद मौर्य यांना उपमुख्यमंत्री बनवण्याचा परिणाम उत्तराखंडमध्येही होणार आहे.

फॉर्म्युला 3 : बंसीधर भगत यांना मोठी ऑफर?

Bansidhar Bhagat

उत्तराखंडच्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत भाजपमध्ये अनिल बलुनी आणि अजय भट्ट यांच्या नावांची चर्चा आहे. भाजपचे ज्येष्ठ आमदार बंसीधर भगत यांना अचानक दिल्लीतून बोलावणे आल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे. बंसीधर भगत यांना दिल्लीत बोलावल्यानंतर त्यांना केंद्राच्या राजकारणात आमंत्रित करण्याचे संकेत मिळत आहेत. त्यासाठी त्यांना लोकसभा किंवा राज्यसभेचा पर्याय दिला जात आहे. अशा परिस्थितीत कुमाऊंमधून अजय भट्ट यांच्याऐवजी बंसीधर भगत यांना लोकसभा किंवा राज्यसभेवर पाठवण्याचा पर्याय दिला जाऊ शकतो. मात्र, भगत यांच्याऐवजी धामी यांना कालाधुंगी मतदारसंघात पोटनिवडणूक लावून विधानसभा निवडणुकीसाठी पुन्हा उभे करण्याची रणनीती भाजप तयार करू शकते. अशा स्थितीत भगत यांना दिल्लीत बोलावण्यामागे संपूर्ण रणनीती तयार केली जात आहे. उत्तराखंडची कमान ७२ वर्षीय बंसीधर यांच्याकडे सोपवली जाईल अशी शक्यता सध्या तरी दिसत नाही.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanam Kapoor Story: गडगंज पगाराच्या नोकरीला रामराम, १२० स्क्वेअरफूटमध्ये सुरुवात, आता हजारो कोटींचा मालक, सक्सेस स्टोरी वाचाच

Sharad Pawar News: शरद पवारांचे अजित पवारांबाबत मोठे वक्तव्य; काकांकडून पुतण्याच्या कौतुकाचं गूढ काय?

Maharashtra Election : ऐन निवडणुकीत भाजपकडून ४० जणांची हकालपट्टी, बंडखोरांना दाखवला घरचा रस्ता!

Matru Vandana Yojana: गर्भवती महिलांना मिळतात ६००० रुपये; केंद्राची मातृत्व वंदना योजना नक्की आहे तरी काय?

Viral Video: प्रवाशांची हातापायी आता थांबणार, प्रवाशाने ट्रेनमध्ये बसण्यासाठी शोधला अजबच जुगाड; पाहा व्हायरल VIDEO

SCROLL FOR NEXT