पंजाबचे नवे मुख्यमंत्री 'चरणजीत सिंग चन्नी' कोण आहेत?; जाणून घ्या Saam TV
देश विदेश

पंजाबचे नवे मुख्यमंत्री 'चरणजीत सिंग चन्नी' कोण आहेत?; जाणून घ्या

वृत्तसंस्था

नवी दिल्ली: दिवसभराच्या चर्चेनंतर काँग्रेसने ( Panjab Congress) रविवारी आपला पंजाबचा नवीन मुख्यमंत्री निवडला आहे. चरणजीत सिंह चन्नी (Charanjit Singh Chinni) पंजाबचे नवीन मुख्यमंत्री म्हणून निवडले गेले आहेत. चन्नी हे दलित समाजातून येतात. चन्नींनी कॅप्टन अमरिंदर सिंग यांची जागा घेतली आहे, कॅप्टन यांनी पंजाब काँग्रेसमधील अनेक दिवसांच्या गोंधळानंतर राजीनामा दिला होता.

चरणजीत सिंग चन्नी कोण आहेत?

* चन्नी हे 48 वर्षीय आहेत ते चमकौर साहिब विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत.

* त्यांना दलित समुदायाचे नेते म्हणून ओळखले जाते, ज्यामध्ये पंजाबची जवळजवळ 1/3 लोकसंख्या आहे.

* चन्नी तीन वेळा आमदार असून ते पंजाब सरकारमध्ये तांत्रिक शैक्षणिक आणि औद्योगिक प्रशिक्षण मंत्री होते.

* अमरिंदर सिंग यांच्याविरोधात बंड करण्यामध्ये चन्नींचा समावेश होता.

दरम्यान, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राजीनामा दिल्यानंतर पंजाबमधीलच नव्हे तर देशातील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. त्यानंतर नवीन मुख्यमंत्री कोण याबाबत चर्चा सुरु होती. AICC च्या झालेल्या बैठकीत चरणजित सिंग चन्नी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. पंजाब काँग्रेसच्या (Panjab Congress) भांडणात, काँग्रेस हायकमांडने मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग (Amarinder Singh) यांना हटवण्याचा निर्णय घेतला होता.

काँग्रेसच्या कार्यवाहक राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांनी कॅप्टन अमरिंदर सिंग यांना राजीनामा देण्यास सांगितले होते. त्यानंतर अमरिंदर सिंग यांनी राज्यापालांकडे आपला राजीनामा सुपुर्द केला होता. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांना हटवण्याची तयारी सुरू होती. राजीनाम दिल्यानंतर पंजाब काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला कॅप्टन अमरिंदर सिंग अनुपस्थित राहिले होते.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Truck Collapsed : २५ फूट खड्ड्यात कोसळला PMC चा ट्रक; मैलापाणी वाहिन्यांच्या दुरुस्तीकरताना दुर्घटना

Maharashtra News Live Updates : लालबागच्या राजाच्या चरणी दहा दिवसात कोट्यावधी रुपये अर्पण

Medical College : वैद्यकीय शिक्षण महागलं, 5 पट शुल्क वाढ!

IND vs BAN, 1st Test: रोहित- विराट पुन्हा एकदा फ्लॉप! गिलने मोर्चा सांभाळला; टीम इंडिया आघाडीवर,पाहा Scorecard

Matheran Toy Train : माथेरान ट्रेन आता पावसाळ्यातही धावणार; मध्य रेल्वेचा प्लान आहे तरी काय? वाचा

SCROLL FOR NEXT