WhatsApp Problem  Saam TV
देश विदेश

WhatsApp Problem : व्हॉट्सअ‍ॅपमध्ये मोठा बिघाड; व्हिडिओ डाउनलोडसह शेअरींगमध्ये अडचणी

व्हॉट्सअ‍ॅप यूजर्सनी ट्वीटरवर तक्रारीच्या पोस्ट शेअर केल्या आहेत.

साम टिव्ही ब्युरो

WhatsApp News : व्हॉट्सअ‍ॅप सर्व्हिसबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून व्हॉट्सअ‍ॅप व्यवस्थीत चालत नसल्याची तक्रार काही यूजर्सनी ट्वीटर अकाउंटवर पोस्ट शेअर करत केली आहे. अनेक व्यक्तींना व्हॉट्सअ‍ॅप वापरताना व्हिडिओ डाउनलोड करणे, व्हिडिओ सेंड करणे, स्टेटस पाहणे यामध्ये अडचणी येत आहेत. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅप यूजर्सनी ट्वीटरवर तक्रारीच्या पोस्ट शेअर केल्या आहेत.

व्हॉट्सअ‍ॅपसह (WhatsApp) वेबसाईट देखील डाउन असल्याची माहिती वेबसाईट डाउनडिटेक्टरवर देण्यात आली आहे. या प्लॅटफॉर्मवर अनेक व्यक्तींनी व्हॉट्सअ‍ॅप चालत नसल्याच्या तक्रारी केल्या आहेत. १६ एप्रिलपासून या समस्या जाणवत असल्याचं या तक्रारीमध्ये म्हटलं आहे.

सर्वरसह अॅपमध्येही समस्या

डाउनडिटेक्टरवर दिलेल्या माहितीनुसार, १७ टक्के व्यक्तींना मॅसेज पाठवण्यात अडचणी आहेत. तर ४१ टक्के व्यक्तींना सर्वरच्या समस्या जाणवत आहेत. त्याचबरोबर ४२ टक्के व्यक्तींना व्हॉट्सअ‍ॅप वापरण्यातच अडचणी येत आहेत. माइक्रोब्लॉगींग प्लॅटफॉर्मवर काही व्यक्तींनी व्हिडिओ डाउनलोड होत नसल्याची तक्रार केली आहे.

व्हॉट्सअ‍ॅपने या सर्व तक्रारींवर अद्याप कोणतेही उत्तर दिलेले नाही. काही यूजर्सना १४ एप्रिल रोत्री रात्री १२ वाजल्यापासून या समस्यांचा सामना करावा लागत आहे. व्हॉट्सअ‍ॅपमध्ये येत असलेल्या अडचणींना वैतागून नागरिकांनी ट्वीटरवर तक्रारींचा भडिमार केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सांगलीचे सगळ्यात जास्त वाटोळ जयंत पाटील यांनी केले

Knee Pain: सतत गुडघे दुखणे हे कोणत्या गंभीर आजाराचे लक्षण आहे?

Maharashtra Politics: पालिकांवर नजर, ठाकरेसेनेचं शक्तीप्रदर्शन, भ्रष्ट मंत्र्यांवरून सरकारला घेरलं

Bogus Voting Issue: बोगस मतदानाविरोधात 'इंडिया'ची वज्रमूठ, आयोगाविरोधात 300 खासदार रस्त्यावर

Patriotic Films: स्वातंत्र्यदिनी नक्की बघा 'हे' मनात देशभक्ती जागवणारे चित्रपट

SCROLL FOR NEXT