Whatsapp Cashback Offer Saam Tv
देश विदेश

व्हॉट्सअ‍ॅप पेमेंट वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! आता 'व्हॉट्सअ‍ॅप पेमेंट'ला मिळणार कॅशबॅक

Whatsapp Cashback Offer: व्हॉट्सअ‍ॅप पेमेंटद्वारे पैसे पाठवल्यास आता कॅशबॅक मिळणार आहे.

साम वृत्तसंथा

नवी दिल्ली: जगातील प्रसिध्द मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) आपल्या वापरकर्त्यांना नेहमी वेगवेगळे फिचस देत असते. आता व्हॉट्सअ‍ॅपने पेमेंट फिचरही सुरु केले आहे. याद्वारे आपण पैसे पाठवू शकतो. आता व्हॉट्सअ‍ॅपवरुन पैसे पाठवल्यास आपल्याला कॅसबॅक मिळू शकतात. व्हॉट्सअ‍ॅपने ही सेवा आता भारतात सुरु करण्याचे नियोजन करत आहे. यासाठी सोशल मीडियावरही चाचपणी सुरु आहे. गुगल पे, पेटीएम आणि फोन पे यासारख्या दिग्गज पेमेंट अ‍ॅप्सशी स्पर्धा करण्यासाठी आता व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) पेमेंटही या प्लॅटफॉर्मवर उतरण्यासाठी सज्ज आहे. (Whatsapp Cashback Offer)

व्हॉट्स पेमेंद्वारे (WhatsApp Pay) १ रुपयाही पाठवला तरिही आपल्याला कॅशबॅक मिळणार आहे. आपण यावरुन कमीत कमी १ रुपया पाठवू शकतो. कॅशबॅक मिळण्यासाठी कोणत्याही अटी घालण्यात आलेल्या नाहीत. पहिल्या तीन व्यवहारांसाठी प्रोत्साहन असणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपवरुन तुम्ही १ रुपयांपेक्षा कमी पैसे पाठवू शकता. ते पैसे व्यवहारासाठी पात्र असतील.

कॅशबॅकमध्ये एवढे पैसे मिळणार

एका अहवालानुसार, व्हॉट्सअ‍ॅपवरुन (WhatsApp) १ रुपये जरी पाठवले तरीही कॅशबॅक मिळणार आहे. व्यवहारानंतर वापरकर्त्यांना ३३ रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळणार आहे.

हे देखील पाहा

पैसे कसे पाठवाल?

व्हॉट्सअ‍ॅप पेमेंट (WhatsApp Pay) वरुन पैसे पाठवण्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) सुरु करावे लागेल, यात तुम्हाला मेसेज टाईप करतो तिथे पैसे पाठवण्याचे चिन्ह दिसेल, त्यावर क्लिक करा. ते सुरु झाल्यानंतर पुढे Add Payment Method हे दिसेल. यावर क्लिक करुन आपले बँक अकाऊंट डिटेल्, भरु शकता. यानंतर तुम्हाला युपीआय चा पर्याय दिसेल. पेमेंट मेथड केल्यानंतर तुम्ही पैसे पाठवू शकता.

Edited By- Santosh Kanmuse

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuljabhavani Mandir : तुळजाभवानी मंदिराला पावणेतीन कोटींचे उत्पन्न; भाविकांमार्फत ६५३ ग्रॅम सोने व १३ किलो चांदी अर्पण

Peanut And Jaggery: थंडीमध्ये शेंगदाणे-गुळ खाण्याचे आश्चर्यकारक फायदे

Tongue Taste Change: 'या' आजारांमुळे अचानक बदलते जीभेची चव; दुर्लक्ष करणं तुम्हाला पडेल महागात

Porsche Accident : पोर्शे अपघाताला ६ महिने पुर्ण; रस्त्यावर उतरत तरुणाईची मेणबत्ती पेटवून आदरांजली

Dance Viral Video: महिलांची कमाल! नऊवारी साडी नेसून महिलांनी धरला 'ही पोरगी असली' गाण्यावर ठेका;Video व्हायरल

SCROLL FOR NEXT