भारीच! WhatsApp चे दिवाळीत हे नवीन फीचर्स लाँच Saam Tv
देश विदेश

भारीच! WhatsApp चे दिवाळीत हे नवीन फीचर्स लाँच

फेसबुकची मालकी असलेले मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp Messaging App विशेष लोकप्रिय आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था : फेसबुकची मालकी असलेले मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp Messaging App विशेष लोकप्रिय आहे. कोणी देखील हे अ‍ॅप सहज वापरू शकते. खासगी चॅटसह अनेक ऑफिशियल कामांसाठी देखील अनेकजण WhatsApp चा वापर करत असतात. तसेच WhatsApp Web वर्जनचा देखील मोठ्या प्रमाणात वापर होत असतो. व्हॉट्सअ‍ॅप नेहमीच आपल्या युजर्सकरिता नवीन फीचर्स New Features आणि अपडेट्स आणत असतात.

हे देखील पहा-

आता दिवाळीच्या, सणासुदीच्या पार्श्वभूमीवर व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या वेब वर्जनकरिता ३ खास फीचर्स लाँच करण्यात आले आहेत. या नव्या फीचरद्वारे आता व्हॉट्सअ‍ॅप वेब वापरणारे युजर देखील फोटो एडिट Photo Edit करू शकणार आहेत. याआधी व्हॉट्सअ‍ॅपच्या वेब वर्जनवर एखाद्याला फोटो पाठवायचे असेल, तर फोटो एडिट करण्याचा काही पर्याय उपलब्ध नव्हता. पण आता WhatsApp Web मध्ये मीडिया एडिटर फीचर Media Edit Feature देण्यात आले आहे.

यामुळे आता WhatsApp Web वापरताना देखील फोटो एडिट करता येणार आहे. या अगोदर व्हॉट्सअ‍ॅपच्या वेब वर्जनवर एखादी लिंक Link शेअर केल्यावर त्याची संपूर्ण माहिती लिहिली जात नव्हती. लिंकचा फक्त एक छोटासा भाग दिसत असत. आता यामध्ये सुधारणा करण्यात आली आहे. नवीन फीचरमध्ये लिंक प्रीव्ह्यू वाढवण्यात आला आहे. यामुळे आता व्हॉट्सअ‍ॅपवर लिंक्स डिटेलमध्ये बघता येऊ शकणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅपने खूप अगोदर इमोजी बरोबरच Emoji स्टिकर्सचा Stickers पर्याय देण्यात आला आहे. याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. आता WhatsApp Web मध्येही चॅटिंग Chatting करताना तुमच्या चॅटनुसार स्टिकर्सच्या सूचना मिळत राहणार आहेत. त्यामुळे तुम्हाला योग्य स्टिकर्स शोधत बसावे लागणार नाहीत. तुमच्या चॅटनुसार तुम्हाला स्टिकर्स उपलब्ध होणार आहेत, यामुळे निवडीला चांगला वाव मिळणार आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Surya gochar: दिवाळीपूर्वी सूर्य-मंगळाने बनवला खास राजयोग; 'या' राशींच्या घरी येईल लक्ष्मी, घराची भरभराटही होईल

Maharashtra Live News Update : निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

Maharashtra Rain Alert : दिवाळीवर पावसाचे सावट, पुढील काही दिवस राज्यात कोसळधारा, 'या' जिल्ह्यांना IMD नं दिला इशारा

Gulab Jamun Recipe : सणासुदीला खास बनवा रताळ्याचे गुलाबजाम, १० मिनिटांत खाण्यासाठी तयार

Transferred : ऐन दिवाळीत पुणे महापालिकेत खळबळ, सहाय्यक आयुक्तांची उचलबांगडी, तिघांचे निलंबन, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT