PM Narendra Modi SAAM TV
देश विदेश

PM Narendra Modi : राहुल गांधी यांच्या आरोपांवर पंतप्रधान मोदी आज लोकसभेत काय बोलणार?

अदानी यांच्यावर झालेल्या कथित घोटाळ्यासंदर्भात पंतप्रधान मोदी काय बोलणार याकडे सर्व जगाचं लक्ष लागलेले आहे.

Shivaji Kale

PM Narendra Modi : राजधानी दिल्ली इथं संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी अर्थसंकल्प सादर केल्यापासून काल पहिल्यांदाच अर्थसंकल्पावर चर्चा झाली. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी लोकसभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अदानी यांचे कसे संबंध आहेत याचा उल्लेख करत सरकारी यंत्रणांचा वापर करून मोदी यांनी अदानी यांना आर्थिक फायदा मिळून दिल्याचा गंभीर आरोप केला आहे.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण...

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावर लोकसभेत बोलणार आहेत. त्यामुळं हिडनबर्ग अहवालानंतर अदानी यांच्यावर झालेल्या कथित घोटाळ्यासंदर्भात पंतप्रधान मोदी (Narendra Modi) काय बोलणार याकडे सर्व जगाचं लक्ष लागलेले आहे.

दरम्यान, अदानी समुहाच्या कथित घोटाळ्यामुळे मंगळवारपर्यंत एक दिवसही संसदेचं कामकाज होऊ शकलेले नव्हतं. विरोधकांनी या प्रकरणात संसदेच्या संयुक्त समितीची मागणी केली आहे. त्यामुळं संसदेच्या दोनही सभागृहाचं कामकाज वारंवार तहकूब करावं लागत होतं. मात्र, मंगळवारी दुपारी 12 नंतर लोकसभेत अर्थसंकल्पावर चर्चा झाली.

काय म्हणाले राहुल गांधी?

'उद्योजक गौतम अदानी यांचा कमी काळात इतका विकास कसा झाला. नरेंद्र मोदी आणि गौतमी अदानी यांचा संबंध काय, असा सवाल करत लोकसभेत राहुल गांधी यांनी मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. 

'मला भारत जोडो यात्रेत एकच नाव ऐकायला मिळालं ते नाव म्हणजे अदानी.... मला दोन-तीन प्रश्न विचारले जायचे. हा व्यक्ती कोणताही व्यवसायात घुसतो आणि तो व्यवयाय यशस्वी होतो. अगोदर हे एक-दोन व्यवसायात काम करत होते. आता आठ ते १० मध्ये काम करत आहे. २०१४ साली अदानी ६०९ व्या क्रमांकावर होते. अदानी आणि देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं काय नातं आहे, असा खडा सवाल राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी लोकसभेत केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan News: शहरात धावायच्या एकाच नंबरच्या दोन रिक्षा; दंड ठोठावल्यानंतर झाला कल्याणमधील बनावट नंबरप्लेटचा पर्दाफाश

Local Body Election: पैसे वाटणाऱ्या शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्याला पकडलं; संतप्त नागरिकांनी मतदान केंद्राबाहेरच चोपलं

Santosh Bangar : संतोष बांगर वादाच्या भोवऱ्यात; निवडणूक अधिकाऱ्यांकडून गुन्हा दाखल, आमदारांनी काय केलं?

भारतात लवकरच लाँच होणार धमाकेदार Realme आणि Redmi चे फोन , फीचर्स आहेत शानदार

मालवणमध्ये एकनाथ शिंदेंनी बॅगेतून काय आणलं? भाजपनंतर शिंदेंवर पैसे वाटपाचे आरोप, VIDEO

SCROLL FOR NEXT