जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी हल्ला करत २७ पर्यटकांची हत्या केली होती. या हल्ल्यामुळे भारताला मोठा धक्का बसला होता. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताकडून गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न सुरू होते. या हल्ल्याच्या १५ दिवसांनंतर भारताने पाकिस्तानचा बदला घेतला. भारतीय लष्कराने एअर स्ट्राईक करत पाकिस्तानातील ९ दहशतवादी तळ नष्ट केले. भारताने या ऑपरेशनला ऑपरेशन सिंदूर असे नाव दिले. जेव्हा भारतीय सैन्य पाकिस्तानात एअर स्ट्राईक करत होते तेव्हा पीएम मोदी आपल्या निवासस्थानी नेमकं काय करत होते याची माहिती समोर आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह रात्रभर ऑपरेशन सिंदूरच्या एका एका गोष्टींवर बारकाईने लक्ष ठेवले. ऑपरेशन नियोजित वेळेनुसार पुढे जावे यासाठी पीएम मोदी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि लष्करी कमांडर्सशी सतत संपर्कात होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. पंतप्रधानांच्या सक्रिय सहभागाने ऑपरेशन सिंदूरचे महत्त्व वाढले आणि दहशतवादाविरुद्ध कारवाई करण्याची सरकारची वचनबद्धता अधोरेखित केली.
२२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी पहलगाम येथे भ्याड हल्ला करत २७ पर्यटकांची निर्घृण हत्या केली होती. या हल्ल्याचा बदला भारताने घेतला आहे. या दहशतवादी हल्ल्यालाला भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूरद्वारे प्रत्युत्तर दिले आहे. भारतीय सशस्त्र दलाने मध्यरात्री १.३० वाजता पाकिस्तानमध्ये १०० किलोमीटर आत घुसून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. पीएम मोदी यांच्या सूचनांनुसार ही कारवाई करण्यात आली आहे. भारतीय सैन्याने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देत राफेल विमानांनी लष्कर-ए-तोएबा आणि जैश-ए-मोहम्मदचे तळ उद्ध्वस्त केली.
ऑपरेशन सिंदूरद्वारे भारताने पाकिस्तानमधील बहावलपूर, कोटली, मुझफ्फराबाद, कोटली, गुलपूर, भिंबर, सियालकोट आणि मुरीदके येथील दहशतवाद्यांचे तळ पूर्णपणे उद्ध्वस्त केले. भारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये १०० पेक्षा अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाला. दहशतवाद्यांच्या तळावर सगळीकडे रक्ताचे सडे वाहत आहेत. या हल्ल्यात जखमी झालेले अनेक दहशतवादी उपचारासाठी रुग्णालयाबाहेर उभे आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.