Halwa Ceremony  Saam tv
देश विदेश

Halwa Ceremony Budget 2024: बजेटच्या आधीच वाटला जातो हलवा, काय आहे हलवा सेरेमनीचं महत्व? जाणून घ्या एका क्लिकवर

Halwa Ceremony Before Budget : 1 फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता हा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. या अर्थसंकल्पाआधी हलवा सेरेमनी केली जाते. या हलवा सेरेमनीबद्दल (Halwa Ceremony ) जाणून घेऊयात.

Vishal Gangurde

Halwa Ceremony Before Budget:

देशाच्या नव्या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला संसदेत सादर केला जाणार आहे. १ फेब्रुवारी २०२४ रोजी देशाचा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारमन या सादर करणार आहेत. सकाळी ११ वाजता हा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. या अर्थसंकल्पाआधी हलवा सेरेमनी केली जाते. या हलवा सेरेमनीबद्दल जाणून घेऊयात. (Latest Marathi News)

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आधीच स्पष्ट केले आहे की, या अर्थसंकल्पात कोणत्याही मोठ्या घोषणा केल्या जाणार नाहीत'. संसदेत सादर करण्यात येणाऱ्या अर्थसंकल्पाआधी हलवा सेरेमनी केली जाते.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाचा शेवटचा अर्थसंकल्प

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील मोदी सरकारच्या कार्यकाळाचा शेवटचा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व भारतीयांचं या अर्थसंकल्पाकडे लक्ष असणार आहे. याच अर्थसंकल्पाआधी अर्थमंत्री आणि या अर्थसंकल्पाशी संबंधित अधिकाऱ्यांमध्ये हा हलवा वाटला जातो. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

स्वातंत्र्यानंतर सुरु झाली परंपरा

हलवा सेरेमनीची परंपरा स्वातंत्र्यानंतर सुरु झाली. संसदेत अर्थसंकल्प सादर करण्याआधीच हलवा सेरेमनी केला जातो. या सेरेमनीसाठी अर्थ मंत्रालयातील सर्व अधिकारी उपस्थित राहतात.

अर्थसंकल्पातील कोणतीही गोपनीय माहिती लीक होऊ नये, यामुळे अर्थ मंत्रालयातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना थांबण्यास सांगितलं जातं. जोपर्यंत अर्थसंकल्प होत नाही, तोपर्यंत त्यांना थांबावं लागतं. यासाठी हलवा सेरेमनी केली जाते.

हलवा सेरेमनी का साजरी केली जाते?

अर्थसंकल्पाचं काम पूर्ण झाल्यावर अर्थ मंत्रालयाच्या १० नॉर्थ ब्लॉक येथे हलवा तायर केला जातो. हलवा तयार केल्यानंतर अर्थमंत्रालयातील कर्मचारी, छपाई करणारे कर्मचारी, अधिकारी यांना हलवा वाटला जातो. शुभ काम करण्यापूर्वी गोड खाल्लं पाहिजे, असं म्हटलं जातं. त्यानुसार या हलवा सेरेमनीचं आयोजन केलं जातं असंही काही जणांचं म्हणणं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महाराष्ट्रात नवीन १२ कोरोना रुग्णांची नोंद, २४ तासांत एकाचा मृत्यू

Maharashtra Politics : एक व्यासपीठ, दोन ठाकरे...महाराष्ट्रातील राजकारण ३६० डिग्री फिरणार, दोन्ही नेत्यांपुढे आव्हाने काय?

Marleshwar Waterfall : रत्‍नागिरीतील मार्लेश्वर धबधब्याचे सौंदर्य जणू स्वर्गच, पावसाळ्यात एकदा भेट द्याच

Diet Soda: तुम्हालाही डाएट सोडा पिण्याची सवय आहे का? वेळीच सोडा नाहीतर होतील 'हे' गंभीर परिणाम

Sushil Kedia: सुशील केडियांच्या ऑफिस फोडणाऱ्या ५ जणांना अटक! वरळी पोलिसांकडून गुन्हा दाखल, कोणती कलमे लावली? VIDEO

SCROLL FOR NEXT