Himachal Pradesh Sanjeev Kumar number plate Saam Tv News
देश विदेश

VIP नंबरप्लेटसाठी काय पण! १ लाखांची स्कूटी, १४ लाखांची नंबरप्लेट, ४ आण्याची कोंबडी १२ आण्याचा मसाला; नंबर पण जोरदार...

1 Lakh Worth of Scooter, 14 Lakh Worth of Number Plate : 1 लाखांची स्कूटीच्या नंबरप्लेटसाठी एका व्यक्तीला तब्बल 14 लाख रुपये मोजावे लागलेत... मात्र हे प्रकरण काय आहे? आणि हा पठ्ठ्या नेमका कुठला आहे? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून..

Bharat Mohalkar

भरत मोहोळकर, साम टिव्ही

हौस भागवण्यासाठी माणूस काहीही करू शकतो. त्यामुळेच हौसेला मोल नसतं, असंही म्हटलं जातं. हिमाचल प्रदेशचे संजीव कुमार यांच्या कृतीने त्याचा प्रत्यय आला. संजीव कुमार यांनी 1 लाखांची स्कुटी खरेदी केली. आणि त्यानंतर स्कुटीला व्हीआयपी नंबरप्लेट मिळवण्यासाठी त्यांनी तब्बल स्कूटीच्या रकमेच्या चौदाप पट म्हणजेच 14 लाख रुपये खर्च केलेत. होय.. तुम्ही ऐकताय ते अगदी खर आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे? पाहूयात..

1 लाखांची स्कूटी, 14 लाखांचा नंबर

HP21C-0001 संजीव कुमारच्या स्कूटीचा VIP नंबर

स्कूटीची मूळ किंमत 1 लाख तर स्कूटीचा नंबर 14 लाखांचा

स्कूटीच्या नंबरसाठी आतापर्यंत देशातील सर्वात महागडा लिलाव

ऑनलाइन लिलावात 13.5 लाखांची दुसरी महागडी बोली

हिमाचल प्रदेशातील या लिलावाची संपूर्ण देशभरात चर्चा होतेय. परिवहन विभागाच्या या लिलावानंतर 14 लाख रुपये थेट राज्य सरकारच्या तिजोरीत जमा झालेत. संजीवकुमार काय म्हणाले ते पाहूया.

1 लाखांची स्कूटी, 14 लाखांची नंबरप्लेट

मला व्हिआयपी नंबर प्लेट मिळवण्याचा छंद आहे. त्यामुळे पॅशनची किंमत नसते. जर तुम्हाला काही खास हवे असेल तर त्याची किंमत पाहू नका. असं विधान त्यांनी केलंय. दरम्यान सोशल मीडियावर प्रतिक्रियाही उमटू लागलेत. काहींनी याला 4 आण्याच्या कोंबडीसाठी 12 आण्याचा अनावश्यक खर्च असा चिमटा काढलाय. तर काहींनी व्हीआयपी कल्चर म्हणून याला संबोधलयं. मात्र हौसेला मोल नसतं, हौसेसाठी काय पण.. हे संजीव कुमार यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केलयं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Panchdhatu Ring: पंचधातू अंगठी वापरल्याने शरीराला कोणते फायदे होतात?

Kapil Show: मी माझ्या बायको आणि गर्लफ्रेंडसोबत...; कपिल शर्माच्या शोमध्ये आलेल्या पाहुण्यामुळे संजय दत्त आणि सुनील शेट्टी आवाक

Ganpati Visarjan 2025 : मुंबईमध्ये विसर्जनावेळी दुर्घटना, मिरवणुकीदरम्यान विजेचा शॉक लागून एकाचा मृत्यू

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये मजुरांना घेऊन जाणारे वाहन पलटी, १२ जण जखमी

Earthquake : अमरावतीमध्ये भूकंपाचे लागोपाठ २ धक्के, घरांतील भांडी पडली, नाल्याला भेगा

SCROLL FOR NEXT