BJP Worker killed In Nadia Saam Tv
देश विदेश

West Bengal Crime: भाजप कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या; पश्चिम बंगालमधील खळबळजनक घटना

BJP Worker killed In Nadia: नादियामध्ये भाजप कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या झाल्याची घटना घडली आहे. पश्चिम बंगालमधील या महिन्यातील ही दुसरी घटना आहे.

Rohini Gudaghe

पश्चिम बंगालमध्ये एका भाजप कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. नादियामध्ये ही घटना घडलेली आहे. हफीझुल शेख असं मृ्त्यू झालेल्या भाजप कार्यकर्त्याचे नाव आहे. त्यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला होता. शनिवारी संध्याकाळी (१ जून) चहाच्या दुकानात हफिजुल शेख उभे होते. तेव्हा त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितल्याची माहिती आज तकच्या हवाल्यानुसार मिळत आहे.

चहाच्या दुकानात असताना हफीझुल शेख यांच्यावर गोळीबार करण्यात (West Bengal Crime) आला. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला गोळी लागली. त्यामुळे त्यांचा मृत्यू झालाय. नुकताच भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे त्यांची हत्या करण्यात आली आहे, असा दावा पीडित भाजप कार्यकर्त्याच्या कुटुंबीयांनी केलेला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडित दोघांवरही गुन्हे नोंद (crime news) आहेत. मुख्य आरोपीची ओळख पटली आहे. परंतु अद्याप त्याला अटक करण्यात आलेली नाही.

यापूर्वीची घटना

पश्चिम बंगालमध्ये २२ मे रोजी देखील अशीच एक घटना घडली होती. नंदीग्राममध्ये भारतीय जनता पक्ष आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली होती. यामध्ये भाजपच्या एका महिला कार्यकर्त्याचा मृत्यू झाला (BJP Worker killed) होता. या हाणामारीमध्ये भाजपचे सात कार्यकर्ते जखमी झाले होते. ही घटना २२ मे रोजी रात्री नंदीग्राममधील सोनचुरा येथे घडली होती. तेथे भाजप आणि टीएमसीचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले होते.

भाजप कार्यकर्त्यांवर धारदार शस्त्रांनी हल्ला केल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. यापूर्व मिदनापूरमध्ये तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली होती. मृतक हे टीएमवायसीचे उपाध्यक्ष होते. भाजपच्या (BJP) काही लोकांनी त्यांची हत्या केल्याचा आरोप टीएमसीने केला होता. याप्रकरणी भाजपच्या ५ कार्यकर्त्यांना अटक देखील करण्यात आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

Viral Video: पेट्रोल पंपावर महिलांचा राडा, आधी चप्पल फेकून मारली, नंतर जमिनीवर आपटलं!

Chakli Recipe: मुलांसाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत चकली, जाणून घ्या सोपी आणि जलद रेसिपी

Chocolate Recipe: फक्त 'या' ४ पदार्थांपासून बनवा चॉकलेट, तोंडात टाकताच विरघळेल

Maharashtra Live News Update: मुंबई स्फोटकांनी उडवून देण्याच्या कालच्या थ्रेडनंतर मुंबई पोलिस सतर्क

SCROLL FOR NEXT