पश्चिम बंगालमधील मालदा जिल्ह्यात भाजपच्या एका कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. गुरूवारी रात्री इंग्रज बाजार भागात ३५ वर्षीय भाजप कार्यकर्त्यावर अज्ञातांनी गोळीबार केला अन् धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यामध्ये ६ जण गंभीर जखमी झाल्याचीही माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर पश्चिम बंगालमध्ये एकच खळबळ उडाली.
भाजप कार्यकर्त्याच्या हत्येनंतर परिसरात तीव्र तणाव निर्माण झाला. दोन गटांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षात ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. मृताच्या कुटुंबीयांनी यामागे सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या (TMC) कार्यकर्त्यांचा हात असल्याचा गंभीर आरोप केला आहे, तर टीएमसीने हे आरोप फेटाळून लावत हा पारिवारिक कलह असल्याचे म्हटले आहे. सध्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
हत्या झालेल्या भाजप कार्यकर्त्याचे नाव समीर घोष (३५) असे आहे. त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करत निर्घृण हत्या करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, घरासमोरच झालेल्या या हल्ल्यात हल्लेखोरांनी प्रथम त्यांच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार केले आणि नंतर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. ते सत्ताधारी पक्षाचे सदस्य असल्यामुळेच पूर्वनियोजित कट रचून हा हल्ला करण्यात आल्याचा गंभीर आरोप मृताच्या कुटुंबीयांनी केला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे.
रामकेली परिसरात भाजप कार्यकर्ते समीर घोष यांच्यावर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला करण्यात आला आणि त्यानंतर त्यांच्यावर दोन गोळ्या झाडण्यात आल्या, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली. विरोधक असलेल्या प्रतिस्पर्धी राजकीय पक्षाच्या लोकांनीच ही हत्या केल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. भाजप कार्यतर्त्याच्या हत्येनंतर परिसरात दोन गटांमध्ये हिंसक संघर्ष उसळला. त्यामध्ये सहा जण जखमी झाले आहेत. या सर्व जखमींना तातडीने उपचारासाठी मालदा मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केली नाही. गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.