WEST BENGAL CABINET EXPANSION: 35 NEW MINISTERS SWORN IN, MINISTRY STRENGTH REACHES 41 UNDER SUVENDU ADHIKARI Saam Tv
देश विदेश

Political News : पश्चिम बंगालच्या मंत्रिमंडळात मोठा विस्तार, ३५ आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

West Bengal Cabinet Expansion News : पश्चिम बंगालमध्ये मंत्रिमंडळाचा मोठा विस्तार करण्यात आला. ३५ नव्या मंत्र्यांनी शपथ घेतल्याने मंत्रिमंडळातील सदस्यसंख्या ४१ वर पोहोचली असून राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा रंगली आहे.

Alisha Khedekar

  • पश्चिम बंगालमध्ये ३५ नव्या मंत्र्यांचा शपथविधी

  • कोलकाता येथील लोक भवनात पार पडला शपथविधी

  • मंत्रिमंडळातील सदस्यसंख्या आता ४१, ३ जागा रिक्त

West Bengal Cabinet Expansion News पश्चिम बंगालच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या निवडणुकांनंतर मंत्रिमंडळाचा मोठा विस्तार करण्यात आला असून मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये ३५ नव्या मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. कोलकाता येथील लोक भवनात सोमवारी पार पडलेल्या भव्य शपथविधी सोहळ्यात राज्यपाल आर. एन. रवी यांनी नव्या मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या विस्तारामुळे राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांची एकूण संख्या आता ४१ वर पोचली आहे.

गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी आणि पश्चिम बंगाल भाजप प्रदेशाध्यक्ष यांनी चर्चा करून नव्या मंत्रिमंडळातील सदस्यांची यादी अंतिम केली होती. पश्चिम बंगालमध्ये एकूण २९४ आमदार आहेत. त्यामुळे विधानसभेच्या एकूण संख्येच्या १५% आमदार मंत्रिमंडळात असू शकतात. म्हणजेच २९४ प्रमाणे १५ टक्क्यांनी ४४ आमदार मंत्रिपद स्वीकारू शकतात. आज ३५ आमदारांनी मंत्री पदाची शपथ घेतली. ९ मे रोजी पश्चिम बंगालच्या भाजप सरकारमधील सहा मंत्र्यांनी शपथ घेतली होती. त्यामध्ये मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्यासह अग्निमित्र पॉल, दिलीप घोष, निशिथ प्रमाणिक, अशोक कीर्तनिया आणि खुदीराम टुडू यांचा समावेश होता.दरम्यान आता पश्चिम बंगालच्या मंत्रिमंडळातील आकडा ४१ झाला असून अजून ३ आमदारांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

आज झालेल्या शपथविधी सोहळ्यात अर्जुन सिंह, तापस रॉय, शरदवत मुखर्जी, जगन्नाथ चट्टोपाध्याय आणि शंकर घोष यांनी सर्वप्रथम मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात दीपक बर्मन, मनोज ओराओन आणि गौरी शंकर घोष यांनी पदभार स्वीकारला. तसेच स्वपन दासगुप्ता आणि दूध कुमार मंडल यांनीही मंत्री म्हणून शपथ घेतली. याशिवाय जोएल मुर्मू, अशोक डिंडा आणि आनंदमय बर्मन यांना राज्यमंत्री म्हणून संधी देण्यात आली. कौशिक चौधरी, गार्गी दास घोष, भास्कर भट्टाचार्य, दिबाकर घरामी आणि सुमना सरकार यांचाही राज्यमंत्री म्हणून मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे.

नव्या मंत्रिमंडळ विस्तारामुळे पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकारची ताकद वाढणार असल्याचे मानले जात आहे. आगामी काळात विकासकामे, पायाभूत सुविधा, रोजगार आणि प्रशासनातील सुधारणा यांवर सरकारचा भर राहणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. नव्या मंत्र्यांवर आता जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे मोठे आव्हान असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला मोठा झटका, थेट नोटीस पाठवली, सुनावणीत काय घडलं?

Shraddha ritual: श्राद्धाच्या दिवशी कावळा आला तर ते अन्न कोणाला द्याल? जाणून घ्या नियम

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Accident: पर्यटकांनी खचाखच भरलेली बस पुलावरून खाली कोसळली, ३ जणांचा जागीच मृत्यू

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

SCROLL FOR NEXT