West Bengal By-Election Saam TV
देश विदेश

पोटनिवडणुकीच्या रिंगणातील बड्या उमेदवाराला अटक; राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ

West Bengal by-election : पश्चिम बंगालमधील ६ ऑक्टोबरच्या पोटनिवडणुकीपूर्वी राजकीय वातावरण तापलं आहे. रेजीनगरचे अपक्ष उमेदवार सैफुल इस्लाम यांना जुन्या हिंसाचाराच्या प्रकरणात पोलिसांनी अटक केली.

Namdeo Kumbhar

West Bengal By-Election : पश्चिम बंगालमधील ६ ऑक्टोबरच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. 'नंदीग्राम' विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार मिलन प्रधान यांच्या अटकेनंतर दुसऱ्याच दिवसात 'रेजीनगर' पोटनिवडणुकीतील अपक्ष उमेदवार सैफुल इस्लाम यांना पोलिसांनी अटक केली आहे.

नेमकं काय घडलं?

२०२१ मधील पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीदरम्यान दोन गटांत हिंसक चकमक झाली होती. या प्रकरणातील आरोपी असलेले सैफुल इस्लाम गेली काही वर्षे फरार होते. बहरामपूर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत सैफुल इस्लाम यांना बेड्या ठोकल्या आहेत. सैफुल इस्लाम हे हुमायुन कबीर यांच्या 'आम जनता विकास पार्टी' (AJUP) शी संबंधित आहेत.एकापाठोपाठ एक विरोधी पक्षांच्या उमेदवारांवर जुन्या गुन्ह्यांत कारवाई होत असल्यामुळे, सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांमध्ये आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.

रेजीनगर विधानसभा पोटनिवडणुकीतील अपक्ष उमेदवार सैफुल इस्लाम यांना ५ वर्षे जुन्या प्रकरणात अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. भूसंपादनाविरोधातील आंदोलनाशी संबंधित २० वर्षे जुन्या प्रकरणात काँग्रेसचे नंदिग्राम पोटनिवडणुकीतील उमेदवार मिलन प्रधान यांना अटक झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशीच ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, २०१९ विधानसभा निवडणुकीच्या वेळी दोन गटांमध्ये संघर्ष झाला होता, त्या प्रकरणी बेरहामपूर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी सैफुल इस्लामला अटक केली, अशी माहिती एका अधिकाऱ्याने पीटीआयला दिली.

मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी भवानीपूरसोबत नंदीग्राममध्येही विजय मिळवला होता. त्यांनी नंदिग्रामधील जागेचा राजीनामा दिला होता. त्या रिक्त जागेसोबतच रेजीनगरच्या जागेवरही पोटनिवडणूक लागली आहे. ६ ऑक्टोबर रोजी या दोन पोटनिवडणुका होणार आहेत. त्याआधीच पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण तापले आहे.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, बेरहामपूर येथे एका पत्रकार परिषदेदरम्यान पोलिसांनी नुकतेच एक ऑडिओ रेकॉर्डिंग प्रसिद्ध केल्यानंतर १४ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. या संभाषणातून दोन समुदायांमध्ये तणाव निर्माण करण्याचा संभाव्य कट असल्याचा पोलिसांनी दावा केला. दरम्यान, मुर्शिदाबाद जिल्ह्यातील एका पोलीस नाक्यावर शुक्रवारी वाहन तपासणीदरम्यान एजेयूपीचे राज्य सचिव आशिक इक्बाल यांना मोठ्या प्रमाणात बनावट चलन आणि अवैध शस्त्रांसह अटक करण्यात आली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bay Leaf Water For Kidney Stones: किडनी स्टोनवर तेजपत्याच्या पाण्याचा घरगुती उपाय, एकदा नक्की करून पाहा

Saree Designs: महिलांनी नऊरात्रीत नेसा 9 प्रकारच्या 9 साड्या, लेटेस्ट डिझाईन्स पाहा

Guava Leaves Benefits for Eye Stye : डोळ्याला रांजणवाडी आली असेल तर पेरूच्या पानांचा सोपा उपाय करा; मिळेल त्वरित आराम

कोल्हापुरात प्रेमसंबंधातून थरारक घटना; अपहरण केलं नंतर प्रेयसीला खोल दरीत ढकललं!

Raw Garlic Benefits: सकाळी कच्चा लसूण खाल्ल्याने शरीरात काय बदल होतात?

SCROLL FOR NEXT