Shocking Saam
देश विदेश

Shocking: डीजेच्या तालावर बेभान होऊन नाचला! अचानक खाली कोसळला, लग्नाच्या वरातीत नेमकं काय घडलं?

Young Mans Shocking Demise at Cousins Wedding: लग्नाच्या मिरवणुकीत नाचताना एका तरुणाचा अचानक मृत्यू झाल्याने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. ही धक्कादायक घटना कोतवाली परिसरातील पोखरभिंडा गावात घडली आहे.

Bhagyashree Kamble

चुलत भावाच्या लग्नात नाचताना एका तरुणाची प्रकृती अचानक बिघडली आणि तो खाली कोसळला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. तरुणाच्या कुटुंबाने त्याला तातडीने एम्स गोरखपूर येथे नेले, मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. तरुणाच्या मृत्यूची बातमी मिळताच लग्नातील आनंद शोकात बदलले. ही धक्कादायक घटना कोतवालीच्या पोखरभिंडा गावात घडली आहे.

गावातील प्रेम तिवारी यांना तीन मुली आणि एक मुलगा अखिलेश मणी उर्फ पंचू होता. अखिलेशच्या चुलत बहिणीचे लग्न होते. गावात लग्नाची जय्यत तयारी सुरू होती. वरात देखील भव्यदिव्य काढण्यात आली होती. सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान लग्नाची मिरवणूक मोठ्या थाटामाटात काढण्यात आली.

अखिलेशनेही वराच्या नातेवाईकांसोबत आणि कुटुंबातील सदस्यांसोबत नाचायला सुरुवात केली. डीजेच्या तालावर अखिलेश सगळ्यांसोबत बेभान होऊन नाचला. नाचत असताना त्याला अस्वस्थ जाणवू लागले. अचानक तो खाली जमिनीवर कोसळला.

अखिलेश बेशुद्ध पडल्यानंतर त्याला तातडीने एम्स गोरखपूर रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी त्याला तपासले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. अखिलेश हा दीदू गोरखपूर विद्यापीठात बीसीएच्या दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी होता. त्याच्या अचानक झालेल्या मृत्यूनंतर परिसरातून शोक व्यक्त केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ramdas Kadam : "पालकमंत्री व्हायचं असेल तर मुंबई-गोवा महामार्ग नीट करा" रामदास कदम यांच भरत गोगावले यांना आवाहन | VIDEO

Maharashtra Live News Update: रोहिणी खडसे घेणार पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट

Maharashtra Police : प्रमोशन रखडले, निवृत्ती जवळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची फरफट; जाणून घ्या सविस्तर

BMC Recruitment: खुशखबर! बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी; पगार ५०,००० रुपये; आजच अर्ज करा

Shravan Somwar Shivamuth: श्रावणात पहिल्या सोमवारी शंकराला कोणती शिवामूठ वाहावी?

SCROLL FOR NEXT