Weather Alert  Saam TV
देश विदेश

Weather Alert : देशातील 'या' राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, शाळा-कॉलेजला सुट्टी जाहीर

श्रीलंकेच्या किनाऱ्याजवळील दक्षिण-पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Weather Alert : एकीकडे देशात थंडीचा कडाका वाढत असताना, दुसरीकडे श्रीलंकेच्या किनाऱ्याजवळील दक्षिण-पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. परिणामी देशातील काही राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. पावसाबरोबरच काही डोंगराळ भागात बर्फवृष्टी सुद्धा होत आहे. येत्या ४८ तासांत पावसाचा जोर (Rain Alert) अधिकच वाढेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला.

हवामान अंदाज एजन्सी स्कायमेटच्या मते, आंध्र प्रदेश किनारपट्टी आणि तामिळनाडूमध्ये हलक्या ते मध्यम पावसासह मुसळधार पाऊस (Weather Alert) पडण्याची शक्यता आहे. मुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळे तामिळनाडूतील अनेक भागातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये शुक्रवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

याशिवाय रायलसीमा आणि केरळमध्ये एक किंवा दोन ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. असा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. श्रीलंकेच्या किनारपट्टीजवळून नैऋत्य बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे देशातील काही राज्यांमध्ये पाऊस पडत आहे. (rain news in india today marathi)

दरम्यान, या कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने देशात थंडाचा कडाटा आणखीच वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातही थंडीचा जोर वाढणार आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पहाटे थंडी पडल्याचे पाहायला मिळतं आहे. पहाटे थंडी तर दुपारी उन्हाचा चटका बसत असल्याचा अनुभव नागरिक घेत आहेत.

काही ठिकाणी ढगाळ वातावरण असलं तरी दुपारी ऊन पडल्यामुळे बदलत्या हवामानाचा अनुभव सर्वजण घेत आहेत. येत्या काही दिवसात थंडी वाढणार असून नागरिकांनी याची आतापासूनच काळजी घ्यावी अशा सूचना हवामान खात्याकडून देण्यात आल्या आहेत.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart blockage: हार्ट ब्लॉकेज असल्यास शरीरात दिसतात हे ६ मोठे बदल

मेट्रो अधिकाऱ्याच्या कृत्याने मुंबई हादरली; इंजिनीअर असलेल्या महिलेवर ऑफिसमध्येच अत्याचार

Maharashtra News Live Update: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चांदी वाहून नेणारी व्हॅन उलटली

ठाणे हादरलं! गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडला संपवलं, नंतर मृतदेह हिरव्या ड्रममध्ये भरून नाल्यात फेकला

CNG, पेट्रोल-डिझेलच्या किंमती भडकल्या, घरगुती गॅस सिलिंडरचे दरही वाढणार?

SCROLL FOR NEXT