Weather Update Today 18 March 2024 Saam TV
देश विदेश

IMD Rain Alert: विदर्भात गारपीठ, वादळी वाऱ्यासह पुढील 3 दिवस पडणार जोरदार पाऊस, हवामान विभागाचा इशारा

Weather Update Today: एकीकडे हिवाळा संपत आला तरी देशातील काही राज्यात अजूनही पावसाचा जोर कायम आहे.

Satish Kengar

Weather Update Today 18 March 2024:

एकीकडे हिवाळा संपत आला तरी देशातील काही राज्यात अजूनही पावसाचा जोर कायम आहे. यातच आता हवामान विभागाने दक्षिण भारतातील सात राज्यात पुढील तीन दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला आहे. यासोबतच काही राज्यात गारपीटही होऊ शकते, असेही हवामान विभागाने सांगितलं आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत पुढील काही दिवस हवामान स्वच्छ राहील. येथील कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 13 अंश सेल्सिअस राहील.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या राज्यांमध्ये गारपीट होण्याची शक्यात

हवामान विभागाने सांगितलं आहे की, महाराष्ट्रात विदर्भात गारपीट होण्याची शक्यता आहे. विर्दभासह मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणामध्येही गारपीठ होऊ शकते. तसेच विदर्भ, झारखंड, तेलंगणा आणि छत्तीसगडमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडू शकतो, अशी शक्यता आयएमडीकडून वर्तवण्यात आली आहे.  (Latest Marathi News)

हवामान विभागाने म्हटलं आहे की, 19 आणि 20 मार्च रोजी ओडिशात विविध ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. 19 मार्च रोजी छत्तीसगड, पश्चिम बंगाल आणि झारखंडमध्ये काही ठिकाणी पाऊस पडू शकतो. तेलंगणा, किनारी आंध्र प्रदेश आणि यानम उपविभागात 20 मार्च रोजी मुसळधार पाऊस पडू शकतो.

कोस्टल आंध्र प्रदेश आणि यानाममध्ये 18 ते 21 मार्च दरम्यान गारपीट होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात 18 आणि 19 मार्चला मेघगर्जनेसह हलका पाऊस आणि 18 ते 19 मार्चला गारपीट होऊ शकते. यासोबतच तेलंगणात 18 आणि 19 मार्च रोजी गारपीट होण्याची शक्यता आहे. 18-20 मार्च रोजी राज्यात वादळ आणि वीज पडण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी ! मतदारसंघ पुनर्रचना विधेयकासाठी जोरदार राजकीय हालचाली; संसदेचे विशेष अधिवेशन बोलावणार?

Maharashtra News Live Update: शिवसेनेवर अंतिम शिक्कामोर्तब? शिंदे-ठाकरे वादावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु

मराठवाड्यात 3 जणांचं कुणबी प्रमाणपत्र अवैध; मनोज जरांगे फडणवीस सरकारवर संतापले|VIDEO

Kalyan : सख्ख्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापाला थेट जन्मठेपेची शिक्षा, कल्याण कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

Supreme Court: CJP वर कारवाई करा; याचिकेवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी, वाचा नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT