Heavy rain alert in 16 states of India, IMD weather forecast for Sunday 
देश विदेश

Weather Update: सोसाट्याच्या वाऱ्यासह कोसळणार धुव्वाधार पाऊस; १६ राज्यांसाठी पावसाचा अलर्ट

IMD Weather Alert: पश्चिमी विक्षोभ पुन्हा सक्रिय झाल्याने उत्तर भारतातील हवामान बदलले आहे. हरियाणा, राजस्थान आणि पंजाबसह देशातील १६ राज्यांत पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Bharat Jadhav

  • देशातील १६ राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज

  • पश्चिमी विक्षोभामुळे उत्तर भारतातील हवामानात बदल

  • रविवारी कोणत्या राज्यांत पावसाचा अलर्ट?

'वेस्टर्न डिस्टर्बन्स' (पश्चिमी विक्षोभ) पुन्हा सक्रिय झाल्यामुळे उत्तर भारतातील अनेक राज्यांत हवामानात बदल झालाय. आज सकाळपासूनच हवामानात झालेल्या या बदलामुळे हरियाणा, राजस्थान आणि पंजाबसह उत्तर भारतातील विविध राज्यांत दिवसभर आकाश ढगाळ राहिले, तर काही भागांत हलक्या पावसाचीही नोंद झाली आहे. याचदरम्यान हवामान विभागाने देशातील १६ राज्यांमध्ये उद्या रविवारी मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय.

हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, लडाख, उत्तराखंड, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश, अंदमान आणि निकोबार बेटे, पश्चिम बंगाल, सिक्कीम, केरळ, तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलाय. एकूण १६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या विविध भागांत पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलंय. यासह उत्तराखंड आणि राजस्थानमध्ये जोरदार वाऱ्यांसह वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. उत्तराखंडमध्ये वाऱ्याचा वेग ताशी ३० ते ४० किमी असू शकतो, तर वाऱ्याचे झोत ताशी ५० किमीपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

राजस्थानमध्येही उद्या रविवारी ३० ते ४० किमी/तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, वाऱ्यांचा वेग ५० किमी/तास पर्यंत पोहोचू शकतो. हवामानातील हा बदल 'वेस्टर्न डिस्टर्बन्स' (पश्चिमेकडील विक्षोभ) मुळे होतोय. दरम्यान, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र पुढील २४ तासांत अधिक तीव्र होऊन त्याचे रूपांतर 'डिप्रेशन'मध्ये होण्याची शक्यता आहे. १६ नोव्हेंबरच्या संध्याकाळपर्यंत त्याचे रूपांतर चक्रीवादळात होऊ शकते.

उत्तर प्रदेशातील हवामान कसे असेल

रविवारसह उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागातील काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. पूर्व उत्तर प्रदेशात पावसाची शक्यता नाहीये. हवामान विभागाने १५ ते १७ नोव्हेंबर दरम्यान राज्यातील पश्चिम भागात दाट धुक्याचा इशारा दिलाय. त्याचप्रमाणे, १६ आणि १७ नोव्हेंबर रोजी पूर्व उत्तर प्रदेशातही दाट धुके पडण्याची शक्यता आहे.

बिहारमधील हवामान

१५ नोव्हेंबर रोजी बिहारमधील हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या सात दिवसांच्या पावसाच्या अंदाजानुसार, १५ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर दरम्यान राज्यात पाऊस पडण्याची कोणतीही शक्यता नाही. परिणामी, बिहारमधील नागरिकांना सध्या पावसापासून दिलासा मिळणार आहे. यासह १५ नोव्हेंबरसाठी राज्यात वादळ, विजांचा कडकडाट किंवा जोरदार वाऱ्यांबाबत कोणतीही चेतावणी देण्यात आलेली नाही.

दिल्लीत कसे असेल हवामान

रविवारी दिल्लीत आकाश ढगाळ राहील. सकाळच्या वेळी बहुतेक भागांत हलके धुके किंवा धुरके राहण्याची शक्यता आहे. सकाळ ते दुपारच्या दरम्यान, काही निवडक भागांत अतिशय हलका पाऊस किंवा रिमझिम पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, दिल्लीचे कमाल तापमान २५ ते २७ अंश सेल्सिअसच्या दरम्यान, तर किमान तापमान १६ ते १८ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे.

राजस्थानमध्ये हलक्या पावसाची शक्यता

१५ नोव्हेंबर रोजी राजस्थानच्या पश्चिम आणि पूर्व अशा दोन्ही भागांतील काही क्षेत्रांत हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने या दोन्ही भागांत मेघगर्जनेसह विजा चमकण्याचाही अंदाज वर्तवलाय. या काळात ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात.

हिमाचल प्रदेशात बर्फवृष्टीची शक्यता

'वेस्टर्न डिस्टर्बन्स'च्या प्रभावामुळे, १५ नोव्हेंबरपर्यंत हिमाचल प्रदेशच्या काही भागांत हलका ते मध्यम पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने रविवारी राज्यातील काही विखुरलेल्या भागांत पावसाचा अंदाज वर्तवलाय.

महाराष्ट्रात हवामान कसे असेल

राज्यात सकाळच्या हवेतील गारवा काहीसा वाढत आहे. तरीही कडाक्याची थंडी आद्याप पडलेली नाही. तापमानातही काहीसे चढ उतार दिसत आहेत. ही स्थिती पुढील काही दिवस राहू शकते, असा अंदाज हवामान विभागाने दिलाय.

जम्मू आणि काश्मीरसाठी पाऊस आणि बर्फवृष्टीचा अंदाज

रविवारी जम्मू आणि काश्मीर तसेच लडाखच्या काही भागांत हलका ते मध्यम पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, १४ आणि १५ नोव्हेंबर रोजी पश्चिम हिमालयीन क्षेत्रात 'वेस्टर्न डिस्टर्बन्स'चा प्रभाव जाणवेल. अधिक उंचीच्या भागांत होणाऱ्या बर्फवृष्टीमुळे थंडीत वाढ होऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तुमच्या सौंदर्यावर पाकचा क्रिम 'बॉम्ब', आरोग्याला घातक उत्पादनांची महाराष्ट्रात घुसखोरी

दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणामागे मोदींचा डाव? डिलिमिटेशनसाठी नेमकं काय घडतंय?

४,५०० लिटर डिझेलचा साठा पाहून पोलीसही चक्रावले; मुंबईत मोठी कारवाई

ऐरोलीत राहायचा, मुंबईतल्या बऱ्याच ठिकाणांची रेकी; दहशतवादी संघटनांच्या संपर्कातील तरुणाला ATS-पोलिसांनी ठोकल्या बेड्या

चतुरस्र अभिनेता-दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; चित्रपटसृष्टीवर शोककळा, ५ दशकांत ६०० हून अधिक चित्रपटांत केलं होतं काम

SCROLL FOR NEXT