Weather Update 9 December 2024 Saam TV
देश विदेश

Weather Forcost: थंडी कमी होऊन तापमान वाढणार, ११ राज्यांमध्ये कोसळणार पाऊस; वाचा संपूर्ण वेदर रिपोर्ट

Weather Update Today: स्कायमेटच्या अंदाजानुसार, वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे २५ ते २८ जानेवारीपर्यंत देशातील विविध राज्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पर्वतीय भागात बर्फवृष्टी होण्याचा देखील अंदाज आहे.

Satish Daud

Weather Update 25 January 2024

डोंगराळ भागात होत असलेल्या बर्फवृष्टीमुळे गेल्या आठवडाभरापासून तापमानात मोठी घट झाली आहे. राजधानी दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक जिल्ह्यांमध्ये कडाक्याची थंडी पडली आहे. हवेतील गारवा वाढल्याने धुक्यांचा प्रभावही वाढला असून नागरिकांना हुडहुडी भरली आहे. दरम्यान, येत्या २८ जानेवारीपर्यंत थंडीचा जोर ओसरणार, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

स्कायमेटच्या अंदाजानुसार, वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे २५ ते २८ जानेवारीपर्यंत देशातील विविध राज्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पर्वतीय भागात बर्फवृष्टी होण्याचा देखील अंदाज आहे. त्याचबरोबर काही राज्यांमध्ये दाट धुके आणि थंडीची लाट येण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. (Latest Marathi News)

पुढील दोन ते तीन दिवसांत छत्तीसगड, तेलंगणा, आंध्र प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममधील काही ठिकाणी हलका पाऊस (Rain Alert) पडण्याची शक्यता आहे. याशिवाय पश्चिम बंगाल, दक्षिण झारखंड, ओडिशाचा काही भाग, छत्तीसगड आणि विदर्भ, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या उत्तर किनारपट्टीसह १२ ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

अंदमान आणि निकोबार बेटांवर हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होऊ शकतो. २६ जानेवारीपासून पावसाचा जोर आणखीच वाढणार असून २८ जानेवारीपर्यंत अनेक राज्यात अवकाळी पाऊस धुमाकूळ घालू शकतो, असंही स्कायमेटने सांगितलं आहे.

दरम्यान, वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे महाराष्ट्रातील तापमानात देखील वाढ होण्याची शक्यता आहे. येत्या ४८ तासांत मराठवाडा, विदर्भ मध्य महाराष्ट्रासह कोकणात पावसाचे आगमन होऊ शकते. रब्बी पिकांसाठी हा पाऊस घातक असून यामुळे पिकांवर रोगराई येऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी, असा सल्लाही हवामान खात्याने दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सुनेत्रा पवारांकडून सभा स्थळाची पाहणी, बारामती पोटनिवडणुकीच्या प्रचाराची आज सांगता सभा

Crime News : तरुणाने लैंगिक अत्याचार केले, धर्मांतरासाठी दबाव टाकला; बीडमधील महिलेसोबत भयंकर घडलं

Trendy Blouse Designs: साडीवर लूक दिसेल अप्सरेसारखा! ऑफशोल्डर ते बॅकलेस ब्लाऊजचे हे 5 पॅटर्न नक्की ट्राय करा

Apple New CEO: Appleचे CEO बदलणार; १५ वर्षानंतर टिम कुक देणार राजीनामा; कोण सांभाळणार धुरा?

ऐन उन्हाळ्यात पाणीबाणी; मुंबई, ठाण्यात २ दिवस पाणीपुरवठा बंद राहणार

SCROLL FOR NEXT