IMD Unseasonal Rain Alert Saam TV
देश विदेश

IMD Rain Alert: पुढील २४ तासांत अवकाळी पाऊस धुमाकूळ घालणार; या राज्यांना झोडपून काढणार, हवामान खात्याचा अंदाज

IMD Unseasonal Rain Alert: पुढील २४ तासांत देशातील अनेक राज्यांमध्ये अवकाळी पाऊस (Heavy Rain) होईल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.

Satish Daud

IMD Unseasonal Rain Alert

गेल्या महिनाभरापासून देशातील हवामानात सातत्यानं बदल होत आहे. कुठं थंडीचा गारठा, तर कुठे ढगाळ वातावरण आहे. राज्यात अवकाळी पावसाने देखील धुमाकूळ घातला आहे. तामिळनाडूतील काही जिल्ह्यांमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलं आहे. पावसामुळे थुथुकुडी आणि तिरुनेलवेली जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत झालं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पुढील २४ तासांत अवकाळी पावसाचा इशारा

दरम्यान, पुढील २४ तासांत देशातील अनेक राज्यांमध्ये अवकाळी पाऊस (Heavy Rain) होईल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. आयएमडीने दक्षिणी तामिळनाडू, दक्षिण केरळ आणि लक्षद्वीपला अलर्ट जारी केला आहे. याठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होईल, असं सांगण्यात आलं आहे.

याशिवाय तामिळनाडू आणि केरळमध्ये सुरू असलेल्या अवकाळी पावसाचा जोर कमी होईल. उत्तर तामिळनाडू, उत्तर केरळ आणि अंदमान निकोबार बेटांवर हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज (Rain Alert) आहे. दुसरीकडे मागील दोन दिवसांत राजधानी दिल्लीतील तापमानाचा पारा घसरला आहे.

सोमवारी दिल्लीत किमान तापमान ७.१ नोंदवलं गेलं आहे. एनसीआर, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थानसह संपूर्ण उत्तर भारतातील भागात तापमानात घट दिसून आली आहे. त्यामुळे नागरिकांना हुडहुडी जाणवत आहे. पुढील चार दिवस दिल्लीतील ढगाळ वातावरण राहिल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.

तामिळनाडूत अवकाळी पावसाचा कहर

तामिळनाडूत अवकाळी पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. IMDच्या माहितीनुसार, मागील २४ तासात तामिळनाडूतील काही जिल्ह्यांमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस झाला आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून शेकडो घरे पाण्याखाली गेली आहेत. हवामान खात्याने आज देखील तामिळनाडूत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT