Weather Forecast  Saam Tv
देश विदेश

Weather Forecast : थंडी गायब, बेमोसमी पावसाचा तडाखा; २-३ दिवस पडणार मुसळधार पाऊस, पाहा IMD चा रिपोर्ट

Weather Update : हवामानामध्ये लवकरत मोठा बदल होणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले आहेत. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे वातावरण बदलून ठिकठिकाणी पाऊस पडणार असल्याचे आयएसडीने म्हटले आहे.

Yash Shirke

Weather Forecast News : भारतातील अनेक ठिकाणी हवामानात बदलणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. उत्तरेकडील विविध राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि हिमवृष्टी होणार आहे. यामुळे डोंगराळ राज्यांमध्ये जनजीवन विस्कळीत होऊ शकते असे हवामान विभागाने म्हटले आहे. मैदानी भागांमध्येही पर्जन्यवृष्टी होऊ शकेल असे म्हटले जात आहे.

हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ सोमा सेन यांनी ANI ला दिलेल्या माहितीनुसार, एक तीव्र वेस्टर्न डिस्टर्बन्स उत्तर भारतातून जात आहे. यामुळे हवामानात बदल होणार आहे. उत्तराखंड, उत्तरप्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालच्या मध्य भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे. दक्षिण भारतातही पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

उत्तरप्रदेश आणि बिहारमध्ये ताशी ३०-४० किलोमीटर वेगाने वारे वाहतील, वादळ आणि विजांचा कडकडाट होण्याचाही हवामान खात्याने इशारा दिला आहे. छत्तीसगडमध्ये गारपीट पडण्याची शक्यता आहे. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस पडेल. दरम्यान महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये उष्ण वातावरण राहील.

उद्या रात्रीपासून म्हणजे २ मार्चपासून एक नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्स उत्तर-पश्चिम भारताला धडकणार आहे. त्यामुळे हवामानात बदल होईल. जम्मू आणि काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड या राज्यांत २ ते ४ मार्च तर हिमाचल प्रदेशात ३ मार्चला मुसळधार पाऊस पडेल. अरुणाचल प्रदेश, आसाम, नागालँडमध्ये पर्जन्यवृष्टी असेल. त्याशिवाय तमिळनाडू, केरळ आणि लक्षद्वीप येथे २ मार्च रोजी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गॅस सबसिडीचे पैसे पाहायला गेली अन् बँक खात्यातील १०० कोटींची रक्कम पाहून महिला चक्रावली, नेमकं प्रकरण काय?

सकाळी नाश्ता बनवायला वेळ मिळत नाही? मग फक्त एकदाच करा तयारी; आठवडाभर नाश्त्याची चिंता मिटेल

Pahadi Masala Chai Recipe : पावसाळ्यात बनवा फक्कड पहाडी मसाला चहा, एक घोट पिताच थंडी जाईल पळून

Maharashtra News Live Update: संतोष देशमुख हत्या प्रकरणाची अत्यंत महत्त्वाची विशेष सुनावणी

High Cholesterol: दररोज सकाळी रिकाम्या पोटी खा या 5 बिया; नसांमधील खराब कोलेस्ट्रॉल झटक्यात वितळेल

SCROLL FOR NEXT