Weather Update Today  Saam TV
देश विदेश

Weather Update : शेतकऱ्यांनो पिकांची काळजी घ्या! 'या' भागांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा

देशातील काही पुन्हा एकदा मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

Satish Daud

Weather Update Today : मागील दोन ते तीन दिवसांपासून वातावरणात मोठा बदल पाहायला मिळत आहे. देशातील काही भागात बर्फवृष्टी सुरू असल्याने पुन्हा एकदा थंडीचा कडाका वाढला आहे. पहाडी भागातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे तापमानात आणखी तीन ते चार अंशांची घट नोंदवण्यात आली आहे. अशातच देशातील काही पुन्हा एकदा मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. (Latest Marathi News)

मागील आठवड्यापासून देशातील वातावरणात मोठा बदल झाला आहे. काही ठिकाणी थंडी तर काही ठिकाणी उन्हाचा कडाचा जाणवत आहे. अशातच येत्या चार दिवसांत हवामानात आणखीच बदल होणार असून हवामान खात्याने अरुणाचल प्रदेशात १६ फेब्रुवारीपर्यंत पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.

त्याचबरोबर पूर्व आसाममध्येही अवकाळी पावसाचा (Heavy Rain) अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. याशिवाय काश्मीर, लडाख, गिलगिट, बाल्टिस्तान आणि मुझफ्फराबादमध्ये हलका पाऊस आणि हिमवर्षाव होण्याची शक्यता आहे. या भागात पावसाव्यतिरिक्त जोरदार वारेही वाहू शकतात, त्यामुळे थंडीचा कडाका आणखी वाढण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे पंजाब आणि हरियाणा या दोन राज्यात अजूनही थंडी कायम आहे. हवामान खात्याने (Weather Updates)  दिलेल्या माहितीनुसार, पंजाबमधील अमृतसर येथे तापमान ६.६ अंश सेल्सिअस, लुधियाना ८.९ अंश सेल्सिअस, पटियाला ८.८ अंश सेल्सिअस, आणि पठाणकोटमध्ये ६ अंश सेल्सिअस, तापमानाची नोंद झाली आहे.

राज्यात थंडीचा कडाका वाढणार

देशभरात कुठे थंडी तर कुठे बर्फवृष्टी होत आहे. त्यातच आता अनेक राज्यात पावसाचा इशारा देण्यात आल्याने हवामानाची परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. याचा परिणाम महाराष्ट्रातील तापमानात सुद्धा होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात यामुळं तापमानाच घट नोंदवण्यात येईल आणि थंडी वाढेल, असा अंदाज बांधला जात आहे. शेतमालावर याचा थेट परिणामही होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: उल्हासनगरात रिजेन्सी कॉम्प्लेक्सवर महापालिकेचा हातोडा

Political News : ठाकरे सेनेत पुन्हा फूट पडणार, शिंदे गटातील आमदाराच्या दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ

Trisha Krishnan Politics: मुख्यमंत्री विजय यांच्यानंतर आता त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? जयललितांशी होतेय तुलना!

Vehicle Insurance : वाहन विम्याचे होणार ४ भाग! १५ डिसेंबरपासून नवा नियम लागू; वाहनमालकांसाठी काय बदलणार?

राजकारणात मोठा भूकंप! 3 आमदार राजीनामा देणार?

SCROLL FOR NEXT