sambhajiraje chhatrapati 
देश विदेश

आज जी परिस्थिती माझ्यावर आली ती दुस-यावर येऊ नये : संभाजीराजे

विहंग ठाकूर

नवी दिल्ली : मराठा समाजाचे प्रश्न आणि मराठा आरक्षणाबाबत राष्ट्रपती रामनाथ काेविंद यांच्याशी चर्चा करण्यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती sambhajiraje chhatrapati हे आज दिल्लीत पाेहचले. येथे दाेन दिवस झाले मुसळधार पाऊस पडत असल्याने रस्त्यांसह बहुतांश घरात पाणी शिरले आहे. विशेष म्हणजे संभाजीराजे छत्रपती यांच्या बंगल्यात देखील पाणी शिरल्याने त्यांना धक्का बसला. या परिसरातील गटारांची व्यवस्था नीट करणे आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी आपल्या मनातील भावनांना वाट माेकळी करुन दिली.

खासदार संभाजीराजे म्हणाले मी पहाटे तीन सव्वा तीनच्या सुमारास झोपायला गेलो. सकाळी सहाला कर्मचा-यांनी मला उठविले आणि महाराज साहेब पाणी यायला लागले आहे असे म्हटले. मी पाहिल्यानंतर पूर्ण घरात सुमारे फूटभर पाणी भरले होते. जे पाणी येत हाेते ते गटाराचे हाेते. त्याची दुर्गंधी पसरली हाेती. त्यातून मला एक जाणवलं ज्या वेळेस महाराष्ट्रात पूर येताे तेव्हा सामान्यांची काय अवस्था हाेत असेल.

अखेरीस आम्ही स्वतःहून माेटार लावून पाणी बाहेर काढले. येथील गटाराच्या व्यवस्थेवर याेग्य पद्धतीने उपाययाेजना करणे आवश्यक असल्याचे संभाजीराजेंनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा आज निकाल लागणार

Congress Protest Live Update : राहुल गांधींच्या नेतृत्वात इंडिया आघाडीचा थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत मेगा मोर्चा; दिल्लीत हायव्होल्टेज ड्रामा

CJI Surya Kant : सरन्यायाधीश सूर्य कांत यांचा इंडिया आघाडीला भेटीस नकार, पाहा काय दिलं कारण

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'मध्ये दुसरी वाइल्ड कार्ड एन्ट्री! सलमान खाननं वीकेंड का वारमध्ये दिलं सरप्राइज, सोशल मीडिया स्टार आहे तरी कोण?

देशभरातून खासदार-आमदार दिल्लीत दाखल; ३ प्रमुख मागण्यांसाठी थेट सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा, राहुल गांधींची आक्रमक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT